Shivaji Maharaj Jayanti 2023 Wishes in marathi: शिवजयंतीच्या शुभेच्छा; शिवजयंती निमित्त Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा शिवरायांचा जन्मदिवस

Shivaji Maharaj Jayanti 2023 Wishes in marathi: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांचे विचार, सुविचार, स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश, एसएमएस, कोट्स, फोटोजद्वारे शेअर करा.

Shiv Jayanti 2023 messages in marathi
शिवजयंतीच्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
  • शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांना मानाचा मुजरा
  • महाराजांना मानाचा मुजरा करत मराठी संदेश, शुभेच्छा, मेसेजेस इतरांना पाठवू शकता

Shivaji Maharaj Jayanti 2023 Wishes in marathi: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी होत आहे. तसेच यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटनप्रेमींचे मुख्य आकर्षण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. (Shiv Jayanti 2023 messages wishes greetings gif file banner to share on birth anniversary of chhatrapati shivaji maharaj)

आपले आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवजयंतीच्या दिवशी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या दिवशी किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असतो. शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांना मानाचा मुजरा करणारे शुभेच्छा संदेश, त्यांचे विचार सोशल मीडियात शेअर करण्यात येतात. सोशल मीडियात व्हायरल होत असलेले आणि शेअर करण्यात येत असलेले असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजी महाराजांचे विचार, सुविचार, स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश, एसएमएस, कोट्स, फोटोच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मित्रांसह फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करू शकता. 

Shiv Jayanti 2023 messages in Marathi : शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे मराठमोळे संदेशपत्र

Shiv jayanti Messages in marathi 3

जिजाऊंसारख्या वाघिणीचा लेक होता तो,

रयतेसाठी देव होता तो,

शत्रूसाठी तळपती आग होता तो,

मुघलांचा बाप होता तो

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv jayanti Messages in marathi 1

स्वराज्यासाठी ज्याने वेचले आपले आयुष्य

पूर्ण स्वराज्य हे एकच होते ज्याचे लक्ष्य

स्वराज्याचे स्वप्न केले ज्यांनी साकार

शिवजयंती दिनी करु त्या शिवछत्रपतींचा जयजयकार

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv jayanti Messages in marathi 4

ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून

अभिमानाने भरून जाई छाती

प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात

वसतात राजे शिवछत्रपती

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

Shiv jayanti Messages in marathi 2

प्रौढ प्रताप पुरंदर, 

क्षत्रिय कुलावतंस, 

सिंहासनाधी श्वर, 

महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

Shiv jayanti 2022 Messages in marathi

स्त्रियांचा जो ठेवितो आदर, 

ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर

त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे

ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे 

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

(Photo: Twitter)

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

(Photo: Twitter)

शिव जन्मोत्सव सोहळा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना 

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी