Shivrajyabhishek Din 2022 Wishes: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त Facebook, Instagram, WhatsApp आणि Social Mediaवर शेअर करा मराठी शुभेच्छा

Shivrajyabhishek Din : आज ६ जून. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याला खर्‍या अर्थाने सुरू झाली. नंतर याच मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला. आजचा दिवस महाराष्ट्र राज्य शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करत आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटात हा दिन साजरा केला जात होता. परंतु आता कोरोनाचे संकट कमी झाले असून रायगडावर राज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे.

chhatrapati shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज ६ जून. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याला खर्‍या अर्थाने सुरू झाली.
  • नंतर याच मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला.
  • आजचा दिवस महाराष्ट्र राज्य शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करत आहे.

Shivrajyabhishek Din 2022 Wishes : आज ६ जून. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याला खर्‍या अर्थाने सुरू झाली. नंतर याच मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला. आजचा दिवस महाराष्ट्र राज्य शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करत आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटात हा दिन साजरा केला जात होता. परंतु आता कोरोनाचे संकट कमी झाले असून रायगडावर राज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृत घोषणा झाली. आजच्य दिवशी शिवप्रेमी रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात आणि मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करतात. आजच्या दिवशी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना फेसबुक, व्हॉट्सॅप, इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावरून शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा द्या.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट

रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट

डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सिंहासनी होतो आरूढ गर्व मराठ्यांचा
मुजरा तुजला आमचा हे प्रभो शिवाजी राजा
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,

सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,

शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!

एक होऊनी करू उत्सव
शिवराज्याभिषेक दिनाचा
एक विचाराने चालवू वारसा
अवघ्या महाराष्ट्राचा
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी