Swami Samarth Punyatithi 2023 Quotes : स्वामी समर्थ  यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार करा शेअर 

Swami Samarth Punyatithi 2023 Quotes : ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत.

shree swami samarth punyatithi 2023 images quotes and wallpapers to share with his devotees on death anniversary
स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार  |  फोटो सौजन्य: Times Now

Swami Samarth Punyatithi 2023 Quotes in marathi : ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. (shree swami samarth punyatithi 2023 images quotes and wallpapers to share with his devotees on death anniversary)

स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे कोट्स (Swami Samarth Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी. स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे कोट्स आपण पाहूया. 


स्वामी समर्थ कोट्स मराठीत (Swami Samarth Quotes In Marathi)

रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो. पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक उर्जा देणारे ठरतात. असेच काही कोट्स (Swami Samarth Quotes in Marathi) आपल्यासाठी. 

  1. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
  2. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे
    Swami samarth punyatithi
  3. जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा
  4. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी
  5.  जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो
  6. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
    Swami samarth punyatithi 1
  7. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे – श्री स्वामी समर्थ 
  8. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये – श्री स्वामी समर्थ 
  9. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
  10. खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते
    Swami samarth punyatithi 2
  11. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही
  12. कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
  13. प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये
    Swami samarth punyatithi 3
  14. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही – श्री स्वामी समर्थ 
  15. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका – स्वामी समर्थ 
  16. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ 
  17. मी आहे ना तुझ्या पाठिशी –  स्वामी समर्थ 
    Swami samarth punyatithi 4
  18. शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते – स्वामी  
  19. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते – श्री स्वामी समर्थ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी