Emotional Detachment: मुलांचं आयुष्य बरबाद करते ‘इमोनशल डिटॅचमेंट’, वाचा सविस्तर

लहानपणी आपल्या भावना व्यक्त करू न शकलेल्या व्यक्ती मोठेपणीदेखील तशाच राहतात. त्यांना इतरांशी नाती जोडताना किंवा संबंध प्रस्थापित करताना अडथळे येतात. आपल्या भावना आपल्यापाशीच ठेवणं त्यांना सोयीचं वाटतं. मात्र या गोष्टीचा त्यांना प्रचंड त्रास होण्याची शक्यता असते.

Emotional Detachment
मुलांचं आयुष्य बरबाद करते ‘इमोनशल डिटॅचमेंट’  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • इमोनशन डिटॅचमेंटचा मुलांच्या भवितव्यावर होतो विपरित परिणाम
 • भावना व्यक्त न करता आयुष्यभर राहतात मनात कुढत
 • नवे मित्र बनवताना आणि नाती जोडताना येतात मर्यादा

Emotional Detachment: लहानपणी घडलेल्या काही गोष्टी (Childhood incidence) या पुढच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करणाऱ्या असतात. विशेषतः जेव्हा मूल किशोरवस्थेत (Teenagers) प्रवेश करतं, तेव्हा त्याला अनेक भावनिक चढउतारांचा सामना करावा लागतो.या काळात प्रत्येक मुलाच्या घरचं वातावरण आणि त्याच्या आईवडिलांची त्याच्याशी वागण्याची पद्धत याचा गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक अवस्थेवर आणि जडणघडणीवर होत असतो. आपल्या आईवडिलांशी ते भावनिकरित्या जोडलेले राहणार की आयुष्यभर ते अलिप्त असणार, हे आईवडिलांच्या वागण्यावर अवलंबून असतं. लहानपणी आपल्या भावना व्यक्त करू न शकलेल्या व्यक्ती मोठेपणीदेखील तशाच राहतात. त्यांना इतरांशी नाती जोडताना किंवा संबंध प्रस्थापित करताना अडथळे येतात. त्यामुळे आपल्या भावना आपल्यापाशीच ठेवणं त्यांना सोयीचं वाटतं. मात्र या गोष्टीचा त्यांना प्रचंड त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना बोलू देणे, त्यांच्या भावना मोकळेपणानं व्यक्त करू देणे या बाबी आवश्यक असतात. 

या गोष्टींमुळे निर्माण होते डिटॅचमेंट

 • जेव्हा मूल कुठल्याही त्रासात असतं आणि आपण त्याला ‘तू ठीक आहेस’ असं सांगण्याचा प्रयत्न करतो.
 • जेव्हा त्याला कंफर्टची गरज असते, मात्र त्याच्या जवळच्या व्यक्तींपासूनच त्याला त्रास होईल असं वाटत असतं.
 • मुलाला जेव्हा रडू नकोस, असं सांगितलं जातं.
 • जेव्हा मुलाच्या भावनांची लोक दखल घेत नाहीत.
 • एखाद्या गोष्टीचा आस्वाद मुलाने कसा घ्यावा, याबाबत त्याला आग्रह केला जाणे
 • आपल्या भावना व्यक्त केल्यावर मुलाला शिक्षा मिळणे
 • मुलाला आपल्या भावना व्यक्त कऱण्याची संधीच न मिळणे
 • आपल्या आईवडिलांच्या भावनांची काळजी घेण्याची जबाबदारी मुलांवर टाकणे
 • घरात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मोकळेपणा आणि स्वातंत्र्य नसणे

अधिक वाचा - Vastu Tips:घराच्या बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नका ही रोपे, नाहीतर भंग पावेल सुख-शांती

इमोशनल डिटॅचमेंटपासून असा करा बचाव

आपल्याला चांगलं वाटेल, आपल्या भावना व्यक्त करता येतील आणि मोकळेपणानं वावरता येईल, अशा जागी आणि वातावरणात राहायला प्रत्येकाला आवडतं. मुलांनादेखील असंच वातावरण मिळण्याची गरज असते. जर मुलं लहानपणी आपल्या आईवडिलांसोबत आपल्या भावना शेअर करू शकली नाहीत, तर आयुष्यभर ती तशीच राहतात. मोठेपणीदेखील आपल्या भावना त्यांना इतरांशी शेअर करता येत नाही. आपलं दुःख, आपल्या वेदना आपल्यापाशीच ठेवणं आणि मनातल्या मनात त्या सहन करणं पसंत करतात. हे कुणाच्याही मानसिक आरोग्यासाठी योग्य नसतं. अशा व्यक्ती नेहमीच अस्वस्थ राहतात आणि मनातून घाबरलेल्या असतात. 

अधिक वाचा - Black Friday Sales 2022: या शुक्रवारपासून वर्षातील सर्वात मोठा ‘ब्लॅक फ्रायडे’ सेल, अमेझॉनवर 85 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

इमोशनल डिटॅचमेंटचा परिणाम

अनेकदा मुलं विपरित परिस्थितीत राहायला शिकतात आणि भितीचा सामना करायला त्यांना फारशा अडचणी येत नाहीत. मात्र याचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होतो. विशेषतः जेव्हा त्यांना नवे मित्र जोडायचे असतात किंवा नवी नाती प्रस्थापित करायची असतात, तेव्हा त्यांना मर्यादा येतात. आपल्या भावना कशा व्यक्त कराव्या, हे त्यांना समजत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी