नवी दिल्ली: पुरुषप्रधान समाजाच्या (Patriarchal society) बेड्या तोडून पुढे जाणाऱ्या महिला (women) आज वेगाने प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या (self-reliance) दिशेने जात आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिला पर्यटनाच्या (tourism) क्षेत्रातही मागे नाहीत. इथेही महिला आता फिरण्यासाठी आपल्या कुटुंबावर (family) किंवा पतीवर (husband) अवलंबून राहिलेल्या नाहीत. एका सर्वेक्षणात (survey) पुढे आलेल्या माहितीनुसार साधारण 75 टक्के महिलांना सोलो प्रवास (solo trip) करण्याची इच्छा आहे किंवा त्यांनी सोलो प्रवास केला आहे. आज आम्ही आपल्याला सोलो प्रवासासाठी उत्तम ठिकाणांची (destinations) यादी देणार आहोत.
भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य असलेले सिक्किम निसर्गप्रेमींसाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे. महिलांना सोलो प्रवासासाठी जाण्याकरता हा पर्याय उत्तम आहे. देशाच्या ईशान्य भागात असलेल्या सिक्किमच्या दक्षिणेला पश्चिम बंगाल आहे.
मुन्नार हे केरळमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. साधारण 80 हजार मैलांपर्यंत पसरलेल्या चहाच्या बागा इथे आहेत. डोंगरउतारांवर हिरव्या चहाच्या मळ्यांचे सौंदर्य आणि मनोहर देखावे खरोखरच आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडतील. इथे दरवर्षी लाखो पर्यटक येतात.
म्हैसूरचा समावेश कर्नाटकातील एक शाही शहर म्हणून करण्यात आला नाही. म्हैसूरला महालांचे शहरही म्हटले जाते. या शहरावर टिपू सुलतानने अनेक वर्षे राज्य केले आहे. जर आपल्याला इतिहासात रस असेल तर आपल्यासाठी हे शहर सहलीसाठी अतिशय उत्तम आहे.
वाराणसी ज्याला बनारस आणि काशीही म्हटले जाते या शहराची संस्कृती गंगेच्या काठी बसलेली आणि प्रचंड धार्मिक महत्व असलेली आहे. ही प्राचीन नगरी आपल्यासोबत अनेक प्राचीन कहाण्या घेऊन उभी आहे.
हिमाचल प्रदेशातील कसौल हे सुंदर ठिकाण सोलो प्रवाशांसाठी उत्तम आहे. इथे आपल्याला पर्वतांचे सौंदर्य, खोल दऱ्याखोरी आणि निसर्गाचे सौंदर्य पुरेपूर अनुभवता येईल. तसेच इथली विहंगम दृष्ये आपल्या कॅमेऱ्यातही कैद करता येतील.
शिलाँग हे निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. इथे आपल्याला निसर्गाचे मनोहर दर्शन घडेल. शिलाँग शहरापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर शिलाँग झऱ्यावर आपल्याला उगवत्या सूर्याचे दर्शन घडेल. इथे जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे.
केरळची राजधानी तिरुवंतपुरमपासून 16 किलोमीटरच्या अंतरावर असलेले कोवलम एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे जगभरातून अनेक पर्यटक येतात. जर आपल्याला नैसर्गिक सौंदर्य आणि समुद्रात प्रतिबिंबित होणाऱ्या आकाशाचे चित्र पाहायला मिळेल.