उंदरांचा घरात धुडगूस सुरूय?, मग घराबाहेर काढण्याचे 'हे' आहेत रामबाण उपाय

जर तुमच्या घरात उंदारानं घुसखोरी केली असेल आणि तर तुम्हाला त्याला घराबाहेर काढायचं असेल तर आम्ही तुम्हाला सोपे उपाय सांगणार आहोत.

Rat
घरात उंदराची घुसखोरी झाली की जगणं मुश्किल होऊन जातं.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घरात उंदराची घुसखोरी झाली की जगणं मुश्किल होऊन जातं.
  • या सोप्या उपायाच्या मदतीनं तुम्ही उंदरांना पळवून लावू शकता.
  • असा कोणता उपाय आहे ज्यामुळे उंदीर तुमच्या घरातून निघून जातील.

मुंबई: घरात उंदराची घुसखोरी झाली की जगणं मुश्किल होऊन जातं. उंदीर हा असा प्राणी आहे की घरात त्याचा शिरकाव झाला तर तो केवळ घाणच नाही तर नुकसानही करतो. धान्याची ही नासाडी करतो. कपडे कुरतडतो, बूट देखील कुरतडून टाकतो. त्यामुळे जर तुमच्या घरात उंदारानं घुसखोरी केली असेल आणि तर तुम्हाला त्याला घराबाहेर काढायचं आहे पण तुम्ही केलेले उपाय करून थकला असाल आणि तरीही उंदीर पळत नसेल तर आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. 

या सोप्या उपायाच्या मदतीनं तुम्ही उंदरांना पळवून लावू शकता. शास्त्रज्ञ आणि वनौषधी तज्ज्ञ दीपक आचार्य यांनी सांगतात की, जर तुम्हाला घरातील उंदरांमुळे त्रास होत असेल तर असा कोणता उपाय आहे ज्यामुळे उंदीर तुमच्या घरातून निघून जातील.

यासाठी तुम्हाला फक्त पुदिन्याचे फूल घ्यावं लागणार आहे. ज्याला पेपरमिंट किंवा पेपरमिंट क्रिस्टल असेही म्हणतात. प्रत्येकी एक-एक ग्रॅम ठेचून घराच्या प्रत्येक दाराच्या बाजूला किंवा घरात उंदरांच्या प्रवेशाच्या ठिकाणी ठेवा. असं 2-3 दिवस करा, घरात उंदीर येणं बंद होऊन जाईल. जर तुम्हाला पुन्हा उंदरांची हालचाल जाणवत असेल तर तीच गोष्ट पुन्हा करा.

अधिक वाचा- भीषण अपघात..! 200 मीटर दरीत कोसळली बस; 16 जणांचा मृत्यू, बसमध्ये होते शाळकरी मुलं

पेपरमिंट क्रिस्टल्स वापरताना, ते तुमच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा तुमचे डोळे लाल होतील आणि जळू लागतील. हे क्रिस्टल्स वापरताना, हे देखील लक्षात ठेवा की काम केल्यानंतर आपले हात साबणाने धुवा.

अधिक वाचा- मुंबईसह कोकणात पावसाची दमदार एन्ट्री, जाणून घ्या आजपासून कुठे आणि कधी पावसाला होणार सुरूवात 

पुदिन्या प्रमाणेच तेजपत्ता ही खूप फायदेशीर आहे. उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी तेजपत्ता मदत करतं. याव्यतिरिक्त उंदीर ज्या मार्गातून घरात प्रवेश करतात किंवा जातात त्या मार्गात लाल मिरची पावडर टाकून ठेवावी. असं केल्यानं उंदीर घरात पुन्हा येताना दिसणार नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी