Smart Kids : तुमचं मूल किती हुशार आहे? ही 6 लक्षणं देतील उत्तर

आपलं मूल हुशार आहे का आणि मोठं झाल्यावरही ते तसंच राहिल का, असा प्रश्न अनेक पालकांना पडलेला असतो. त्यासाठी काही लक्षणांवर लक्ष दिलं, तर याचं उत्तर मिळू शकतं.

Smart Kids
तुमचं मुल हुशार असण्याची 6 लक्षणं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मूल हुशार असण्याची सहा लक्षणं
  • या लक्षणांवरून समजते मुलांची प्रगती
  • प्रत्येक मूल असतं वेगळं

Smart Kids : आपलं मूल हुशार (Smart Kid) असावं, असं अनेकांना वाटतं. मुलाला हुशार करण्यासाठी अनेकदा पालक त्याच्यावर दबाव आणतानाही दिसतात. काहीवेळा तर आपलं मूल इतरांच्या तुलनेत मागे पडेल आणि आयु्ष्यात यशस्वी होणार नाही, याची भीतीही पालकांना सतावत असते. त्यामुळे आपल्या मुलानं सदैव इतरांपेक्षा हुशार असावं आणि अभ्यासात प्रगती करावी, असं बहुतांश पालकांना वाटत असतं. अनेकदा लहानपणी आपलं मूल खूप हुशार आहे, असं पालकांना वाटत असतं. पण जसजसं ते मोठं होऊ लागतं, तसतशा पालकांच्या अपेक्षा वाढू लागतात. त्यामुळे हुशार असूनही आपलं मूल समाधानकारकरित्या प्रगती करत नाही, असं पालकांना वाटू लागतं आणि ते त्याच्यावर अभ्यासासाठी दबाव आणायला सुरुवात करतात. 

ओळखा लक्षणं

आपलं मूल हुशार असणं किंवा नसणं हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. केवळ अभ्यासात तेे कसं आहे आणि परीक्षेत त्याला किती मार्क्स मिळतात, यावर त्याची हुशारी ठरत नसते. आपलं मूल किती हुशार आहे, हे अनेक लक्षणांवरून दिसून येतं. त्यापैकी काही महत्त्वाची लक्षणं जाणून घेऊया. 

१. संवादकौशल्य

एका वेबसाईटनं केलेल्या सर्वेक्षणानुसार जर तुमच्या मुलाचं संवादकौशल्य चांगलं असेल, तर ते हुशार असल्याचं लक्षण आहे. जर ते कुठल्याही व्यक्तीशी चांगला संवाद साधत असेल आणि इतरांशी पटकन मैत्री करू शकत असेल, तर ते मूल हुशार असल्याचं मानलं जातं. 

२. इशारे समजणे

जर तुमचं मूल लहान असेल आणि अजून बोलू लागलं नसेल तरीही त्याच्या हुशारीचा अंदाज येऊ शकतं. हुशार मुलं आईवडिलांचा इशारा पटकन समजतात आणि त्यानुसार कृती करताना दिसतात. 

अधिक वाचा - Child IQ : मुलांची बौध्दिक पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक पालकाने अंमलात आणाव्यात अशा या मूलभूत बाबी...

३. भावना व्यक्त करणे

जर तुमचं मूल सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भावना योग्य पद्धतीने व्यक्त करत असेल, तर त्याची बुद्धीमत्ता विकसित होत असल्याचंच हे लक्षण आहे. तुमच्या मुलाची प्रगल्भता योग्य वेगाने वाढत असल्याचं हे लक्षण आहे. 

४. सावधानता

जर तुमचं मूल योग्य वेळी सावध होत असेल आणि समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहून संवाद साधू शकत असेल, तर ते हुशार असल्याचंच हे लक्षण आहे. जिनियस मुलं ही लहानपणापासूनच डोळ्यात डोळे घालून संवाद साधताना दिसतात. 

अधिक वाचा - Today in History Monday 1st August 2022: आज आहे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी तर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, जाणून घ्या आजचे दिनविशेष

५. वेगाने प्रगती

जर तुमचं मूल वेगाने एकेक प्रगतीचे टप्पे गाठत असेल तर ते इतरांपेक्षा अधिक स्मार्ट असल्याचं सिद्ध होतं. उदाहरणार्थ इतरांपेक्षा कमी वयात ते उभं राहायला शिकत असेल, कमी वयात बोलायला शिकत असेल, तर अशी मुलं इतरांपेक्षा अधिक स्मार्ट आणि तल्लख असल्याचं सांगितलं जातं. 

६. हट्ट

जर तुमचं मूल तुमच्याकडे हट्ट करत असेल आणि त्याचा हट्ट सिद्ध कऱण्यासाठी तुमच्याशी डोकं वापरून वाद घालत असेल, तर तुमचं मूल हुशार आहे, असं समजायला हरकत नाही. त्याला जे हवं आहे, ते मिळवण्यासाठी मूल प्रयत्न करत असल्याचं हे लक्षण आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी