Skin Care Tips: हिवाळ्यात स्किन ड्राय होते? चेहऱ्याला लावा हा देसी फेस पॅक; चेहरा होईल सॉफ्ट आणि चमकदार

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Oct 29, 2022 | 14:21 IST

Homemade Face Pack For Dry Skin: जर हिवाळ्यात तुमची स्किन देखील ड्राय आणि निस्तेज झाली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती फेस पॅकबद्दल सांगणार आहोत जे तुमची स्किन मुलायम आणि चमकदार बनवण्यास मदत करतील.

Skin Care Tips
हिवाळ्यात स्किन ड्राय होते? हा देसी फेस पॅक लावा चेहऱ्याला 
थोडं पण कामाचं
  • स्किन हेल्दी (skin healthy) ठेवण्यासाठी दररोज स्किनची (Daily skin care) काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
  • स्किनच्या कोरडेपणावर उपचार न केल्यास स्किन ड्राय वाटू लागते.
  • तुम्हाला अशाच काही घरगुती फेस पॅकबद्दल सांगणार आहोत जे तुमची स्किन सॉफ्ट आणि चमकण्यास मदत करेल.

मुंबई: Homemade Best Moisturizers Face Pack For Dry Skin: स्किन हेल्दी (skin healthy)  ठेवण्यासाठी दररोज स्किनची (Daily skin care)  काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमच्या स्किनच्या समस्या तर दूर होतातच शिवाय तुमची स्किन चमकदारही बनते. विशेषतः हिवाळ्याच्या सुरुवातीला स्किन खूप कोरडी होऊ लागते. अशा परिस्थितीत स्किनच्या कोरडेपणावर उपचार न केल्यास स्किन ड्राय वाटू लागते. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती फेस पॅकबद्दल सांगणार आहोत जे तुमची स्किन सॉफ्ट आणि चमकण्यास मदत करेल. 

हिवाळ्यात लावा हे देसी फेसपॅक

नारळाचा फेस पॅक (coconut face pack)

जर तुम्हाला स्किनच्या कोरडेपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही नारळाचा फेस पॅक लावू शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे खोबरेल तेलात एक चमचा मध मिसळा. आता ते तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. यामुळे तुमची स्किन हायड्रेट होईल. जर तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून 3 दिवस लावलात तर तुमची ड्राय स्किन दूर होईल.

अधिक वाचा-  46 व्या वर्षीही पूजा बत्रा दिसते Fit-Hot, हे आहे फिटनेस सीक्रेट

केळीचा फेस पॅक (Banana face pack)

केळीचा फेस पॅक ड्राय स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. केळीचा फेस पॅक बनवण्यासाठी एक पिकलेले केळे घ्या आणि त्यात दोन चमचे मध घाला. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. हा फेस पॅक तुमची स्किन घट्ट आणि मुलायम करेल. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून 3 दिवस लावू शकता.

चॉकलेट आणि मध (Chocolate and honey)

चॉकलेट स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुमचा चेहरा ड्राय झाला असेल तर तुम्ही चॉकलेटचा फेस पॅक लावू शकता. तो अप्लाय करण्यासाठी, एका कपमध्ये 4 डार्क चॉकलेट वितळवा. त्यात एक चमचा मध टाकून गुळगुळीत पेस्ट बनवा आणि 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा पाण्याने धुवा असे केल्याने तुमचा चेहरा मुलायम आणि चमकदार होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया याचा प्रयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी