तुमच्या झोपेच्या सवयीमुळे तुम्ही म्हातारे होत आहात का?

लाइफफंडा
Updated Sep 07, 2018 | 15:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

चांगल्या झोपेमुळे आपली त्वचा नेहमी हेल्दी राहते. मात्र, याच्या उलट होऊ लागले तऱ?. आपल्या झोपेच्या सवयीमुळे आपल्या त्वचेला नुकसान पोहोचू शकते.

sleep
झोप 

मुंबई : चांगल्या झोपेमुळे आपली त्वचा नेहमी हेल्दी राहते. मात्र, याच्या उलट होऊ लागले तऱ?. आपल्या झोपेच्या सवयीमुळे आपल्या त्वचेला नुकसान पोहोचू शकते. आपण ज्या पद्धतीने झोपतो त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होते. झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्वचेला मोठे नुकसान पोहोचू शकते. 

उशीमुळे त्वचेला होते हे नुकसान

झोपण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे पाठीवर झोपणे. २०-३० डिग्री अँगलवर झोपल्याने शरीरातील द्रवपदार्थांचा प्रवाह चांगल्या त-हेने होतो. ज्यांना कुशीने झोपायाची सवय असते यामुळे आपला चेहरा उशीवर दबला जातो. उशीवर बॅक्टेरियासोबत त्याच्या कव्हरवर ती क्रीमही लागते जी आपण रात्रीच्या वेळेस लावतो. यासाठी उशीचे कव्हर वांरवार बदलणे गरजेचे असते.

पोटावर झोपल्याने काय होतो परिणाम?

अनेकांना पोटावर झोपायला आवडते. मात्र, तुम्हाला माहीत आहे की ही सवय सगळ्यात वाईट आहे. जेव्हा आपण झोपो तेव्हा आपली त्वचा श्वास घेत असते. पोटावर झोपल्याने संपूर्ण उशीवर दाबला जातो यामुळे त्वचेवरील रोमछिद्रे बंद होतात. बंद रोमछिद्रांमुळे पिंपल्स, चेहऱ्यावर रॅशेस तसेच त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे या पद्धतीने झोपणे चुकीचे असते. 

पोटावर झोपण्याऐवजी एका कुशीने झोपणे कमी नुकसानदायक ठरते. मात्र, ही पद्धतही योग्य नव्हे. जेव्हा तुम्ही एका कुशीवर झोपता तेव्हा एका बाजूला अधिक दबाव पडतो. यामुळे तुमचे चीकबोन फ्लॅट होतात. तसेच एकाच बाजूला सतत घर्षण झाल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. तसेच त्वचेवर एखादी क्रीम लावल्यास ती उशीवर पसरते आणि त्वचा त्याला अॅब्सॉर्ब करू शकत नाही. 

पाठीवर झोपल्याने होतो हा फायदा    

पाठीवर झोपणे ही झोपण्याची आदर्श पद्धत आहे. पाठीवर झोपल्याने चेहऱ्याच्या त्वचेवर कोणताही दाब येत नाही. यामुळे फाईन लाईन्स, स्किन फ्लॅटनिंगसारख्या समस्या कमी होतात. तसेच त्वचा चिरतरूण आणि मुलायम होते. एका कुशीने झोपल्यास शरीरातील द्रव पदार्थ डोळ्यांजवळ जमी होतात. ज्यामुळे डोळे सुजलेले दिसतात. मात्र, पाठीवर झोपल्याने असे होते नाही. यामुळे उशीच्या कव्हरशी चेहऱ्याचा संबंध येत नाही. यामुळे पाठीवर झोपणे चांगले.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...