Sleeping Tips in Marathi: तुम्ही सुद्धा रात्री लाईट सुरू ठेवूनच झोपता? मग या समस्यांचा वाढू शकतो धोका, स्टडीत झाला खुलासा

Effects of sleep with lights on: रात्री झोपताना अनेकजण लाईट्स सुरू ठेवतात. तुम्हालाही अशीच सवय आहे? मग ही सवय बंद करण्याची गरज आहे. कारण या संदर्भात एका अभ्यासात मोठा खुलासा झाला आहे.

sleeping with lights on may affect on your health says study read in marathi
Sleeping Tips in Marathi: तुम्ही सुद्धा रात्री लाईट सुरू ठेवूनच झोपता? मग या समस्यांचा वाढू शकतो धोका, स्टडीत झाला खुलासा (Photo: Pexels) 

Sleeping with lights on cause health effects: रात्रीच्या सुमारास लाईट्स सुरू ठेवून झोपण्याची अनेकांना सवय असते. यामागचं कारण म्हणजे अंधारात अनेकांना भीती वाटते. तुम्हाला सुद्धा अशीच सवय आहे का? मग सावध व्हा... कारण ही सवय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. (sleeping with lights on may affect on your health says a study read in marathi)

2022 मध्ये झालेल्या एका स्टडीनुसार, लाईट्स सुरू ठेवून झोपणाऱ्या सहभागींनी नोंदवले की ते चांगल्याप्रकारे झोपले. मात्र, मेंदूच्या तपासणीत असे दिसून आले की, त्यांना गाढ झोप कमी लागली. इतकेच नाही तर त्यांचे चयापचय आणि ह्रदयावरील परिणाम आणखी आश्चर्यकारक होते. रक्तांच्या नमुन्यांवरुन दिसून आले की, एका रात्री खोलीत लाईट्स सुरू ठेवून प्रकाशात झोपल्याने सहभागीनींचा इन्सुलिन प्रतिरोध वाढला. जाणून घ्या लाईट्स सुरू ठेवून झोपण्याचे तोटे नेमके काय आहेत.

लठ्ठपणा

महिलांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे समोर आले की, जे लोक टीव्ही किंवा लाईट्स सुरू ठेवून झोपतात त्यांना लठ्ठपणाचा धोका (लाईट्स बंद करुन झोपणाऱ्यांच्या तुलनेत) अधिक असतो.

हे पण वाचा : हे आसन कराल तर लठ्ठपणा विसराल

डिप्रेशन

रात्री लाईट्स सुरू ठेवून झेपल्याने नैराश्य वाढण्याची शक्यता अधिक असते. इतकेच नाही तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाचा तुमच्या मूडवर सुद्धा वाईट परिणाम होतो. यामुळे तुमचा मूड बदलून चिडचिड होण्याची शक्यता अधिक असते.

हे पण वाचा : Chanakya Niti: अशा महिला पतीसाठी असतात भाग्यशाली

डायबिटीज

रात्री झोपताना लाईट्स बराचवेळ सुरू राहिल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, डायबिटीज होण्याचा धोका सुद्धा वाढतो.

हे पण वाचा : जोडीदाराला करायचंय इम्प्रेस? मग राशीनुसार निवडा लिपस्टिक कलर

लाईट्सशिवाय झोप येत नसेल तर काय करावे?

जर तुम्हाला लाईट्सशिवाय झोप येत नसेल तर नॉर्मल लाईट्स ऐवजी लाल बल्ब सुरू ठेवा. कारण, लाल नाईट बल्बचा इतर रंगीत बल्बप्रमाणे प्रभाव पडत नाही.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी