Gold Plated Sweets ५० हजार रुपयांत १ किलो मिठाई, स्पेशल २४ कॅरेट सोन्याच्या वर्खातील मिठाई

Special 24 Carat Gold Plated Sweets On Diwali, 50 Thousand Rupees Per Kg उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एका मिठाई विक्रेत्याने स्पेशल २४ कॅरेट सोन्याच्या वर्खातील मिठाई विक्रीसाठी ठेवली आहे. ही मिठाई ५० हजार रुपये किलो या दराने उपलब्ध आहे.

Special 24 Carat Gold Plated Sweets On Diwali, 50 Thousand Rupees Per Kg
५० हजार रुपयांत १ किलो मिठाई, स्पेशल २४ कॅरेट सोन्याच्या वर्खातील मिठाई  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • ५० हजार रुपयांत १ किलो मिठाई, स्पेशल २४ कॅरेट सोन्याच्या वर्खातील मिठाई
  • मिठाईचा एक तुकडा खरेदी करण्यासाठी जवळपास ५०० रुपये मोजावे लागतील
  • फक्त लखनऊच नाही तर आणखी काही शहरांतून सोन्याच्या वर्खातल्या मिठाईला मागणी

Special 24 Carat Gold Plated Sweets On Diwali, 50 Thousand Rupees Per Kg । लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एका मिठाई विक्रेत्याने स्पेशल २४ कॅरेट सोन्याच्या वर्खातील मिठाई विक्रीसाठी ठेवली आहे. ही मिठाई ५० हजार रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. संपूर्ण लखनऊमध्ये या सोन्याच्या वर्खाच्या मिठाईची चर्चा आहे. या मिठाईचा एक तुकडा खरेदी करण्यासाठी जवळपास ५०० रुपये मोजावे लागतील. ही मिठाई दुकानातील आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली आहे.

Diwali 2021: अननस नारळ बर्फीने करा दिवाळीचं सेलिब्रेशन

Diwali 2021: या मिठाई प्रेशर कुकरमध्येही बनवता येतात, जाणून घ्या सोपी रेसिपी

Diwali 2021 : घरच्या घरी बनवा केशर मूग डाळ बर्फी...

दिवाळीसाठी घरच्या घरी तयार करा कुरकुरीत जिलेबी....

सोन्याच्या वर्खातली मिठाई महाग आहे. पण नागरिकांमध्ये या महागड्या मिठाईविषयी प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे फक्त लखनऊच नाही तर आणखी काही शहरांतून या सोन्याच्या वर्खातल्या मिठाईला मागणी आहे. 

'आम्ही एक्झॉटिका २४ कॅरेट गोल्ड प्लेटेड मिठाई विक्रीसाठी ठेवली आहे. या मिठाईत किन्नौरचे चिलगोजे, काश्मीरचा केशर, मॅकडामिया नट्स, ब्ल्यू बेरी यांचा समावेश आहे. अतिशय चविष्ट असलेल्या या मिठाईला चाखण्याचा आनंद निराळाच आहे'; असे मिठाई विक्रेत्याने सांगितले.

सोन्याच्या वर्खातल्या मिठाईचे पॅकिंग शाही पद्धतीने झाले आहे. गोल्ड फॉइलमध्ये गुंडाळलेली ही मिठाई एका आकर्षक पेटीत पॅक करुन दिली जाते. राजा-महाराजांना भेटी देण्याच्या परंपरेची आठवण ही मिठाई बघताना होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी