Safety tips for matrimonial sites: मॅट्रिमोनिअल साईट्सवर जोडीदार शोधताना होऊ शकते फसगत, लक्षात ठेवा ‘या’ सेफ्टी टिप्स

मॅट्रिमोनिअल साईट्सच्या माध्यमातून आपल्याला हवा असणारा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. मात्र या प्रक्रियेत अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळेच मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदाराचा शोध घेत असताना काही मूलभूत गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते.

Safety tips for matrimonial sites
मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदार शोधताना सावधान  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मॅट्रिमोनिअल साईट वापरताना काळजी घेणे आवश्यक
  • अनेकदा होऊ शकते फसवणूक
  • खासगी माहिती जाहीर करण्यापूर्वी व्हा सावध

Safety tips for matrimonial sites: आपल्याला आयुष्यात अनुरुप आणि अपेक्षित जोडीदार (Life partner) मिळावा, असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी अनेक तरुण आणि तरुणी जोडीदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. ज्यांचं लग्नापूर्वी एकमेकांवर प्रेम जडतं, ते आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. मात्र प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रेमविवाहाचा प्रसंग येत नाही. अशा अनेक तरुण-तरुणींना आपला जोडीदार शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या प्रयत्नात तरुणांना साथ देतात त्या मॅट्रिमोनिअल साईट्स (Matrimonial sites). या साईट्सच्या माध्यमातून आपल्याला हवा असणारा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. मात्र या प्रक्रियेत अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळेच मॅट्रिमोनिअल साईटवर जोडीदाराचा शोध घेत असताना काही मूलभूत गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. जाणून घेऊया, अशाच काही बाबींविषयी. 

कुटुंबीयांची घ्या मदत

अनेकदा तरुण-तरुणी कुणाशीही सल्लामसलत न करता मॅट्रिमोनिअल साईटवर प्रोफाईल तयार करतात आणि परस्पर आपला जोडीदार शोधायला सुरुवात करतात. या प्रक्रियेत कुटुंबीयांना सहभागी केलं जात नाही आणि त्यांचा सल्लाही घेतला जात नाही. मात्र लग्नासाठी घरच्या मंडळींची पसंती, मान्यता इत्यादी गोष्टींची गरज असते. त्यांच्या अनुभवाचा तरुणांना फायदा होऊ शकतो आणि काही संशयास्पद बाबी पटकन समोर येऊ शकतात. 

नीट करा तपासणी

मेट्रोमोनियल साईट्सवर अनेकजण आकर्षक प्रोफाईल पाहून खूश होतात. मात्र अशा वेबसाईटवर अनेक फेक प्रोफाईलदेखील असतात. त्यामुळे प्रोफाईलमधील प्रत्येक बारीकसारीक तपशील तपासून घेणे आवश्यक असते. सर्व गोष्टींची खातरजमा केल्याशिवाय पुढे जाऊ नका. 

अधिक वाचा - Today in History, Saturday, 29th October 2022 : आज पद्मश्री विजेंदर सिंग आणि माजी खासदार माणिकराव गावित यांचा जन्मदिन, वाचा आजचे दिनविशेष

खासगी माहिती जाहीर करू नका

मॅट्रिमोनिअल साईटवर एखाद्या व्यक्तीशी चर्चा करताना आपले खासगी तपशील त्याच्यासोबत शेअर करू नका. अनेकदा साईटवरील व्यक्तीचं प्रोफाईल पाहून इंप्रेस झाल्यामुळे लोक आपल्या बँक खात्याचे तपशील आणि इतर खासगी माहिती शेअर करतात. याचा गैरवापर करून ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. अशा प्रकारांमुळे तुम्ही कधीही फ्रॉडची शिकार होऊ शकता. त्यामुळे मॅट्रिमोनिअल साईटवर कुठलेही तपशील जाहीर करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. 

योग्य साईटची निवड

आजकाल इंटरनेटवर मॅट्रिमोनिअल साईट्सचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. तुमचा लाईफ पार्टनर शोधण्यासाठी विश्वासार्ह साईटची निवड करणं आवश्यक आहे. अशा साईटची फ्री मेंबरशीप न घेता पेड मेंबरशिप घ्या. त्याचप्रमाणे तिथं प्रोफाईल तयार करण्यापूर्वी वेबसाईटची सुरक्षा व्यवस्था मजबूत आहे की नाही, हेही तपासून पाहा. 

अधिक वाचा - White bed sheet reason: हॉटेलमध्ये का वापरतात पांढरं बेडशीट? कारण आहे मजेशीर

व्हेरिफिकेशन प्रक्रिया

अनेकदा प्रोफाईल तयार केल्यानंतर मॅट्रिमोनिअल साईट्सकडून पर्सनल लेव्हलवर व्हेरिफिकेशन केलं जातं. असा वेळी आपली संपूर्ण खरी माहिती द्या आणि काही अडचणी असतील, तर स्पष्टपणे विचारा. 

डिस्क्लेमर - मॅट्रिमोनिअल साईट वापरताना घ्यावयाच्या खबरदारीबातच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी