Ganesh Chaturthi 2022: यंदा गणेश चतुर्थीला बनवा Sugar Free मोदक आणि बासुंदी; चवीसह आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 29, 2022 | 13:42 IST

Ganesh Chaturthi Sugar Free Recipe: गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत. यावेळी तुम्ही मोदकासह बासुंदीही (Basundi) करून पाहू शकता. मिठाईला आरोग्यदायी पर्याय म्हणून तुम्ही साखरमुक्त मोदक (Sugar Free Modak) म्हणजेच शुगर फ्री मोदक आणि बासुंदी (Basundi) बनवू शकता.

Sugar Free Modak
शुगर फ्री मोदक 
थोडं पण कामाचं
  • भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह 10 दिवस असतो.
  • घराघरात गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते.
  • गणपती बाप्पाला (Ganapati Bappa) फुले अर्पण केली जातात. या काळात विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात.

मुंबई:  Ganesh Chaturthi Special Recipe: गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह संपूर्ण जगभरात पाहायला मिळतोय.  भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi)  सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह 10 दिवस असतो. या दरम्यान घराघरात गणेशमूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. आरती, भजन करण्यात येते. गणपती बाप्पाला (Ganapati Bappa) फुले अर्पण केली जातात. या काळात विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. गणपती बाप्पासाठी गोडाचे पदार्थ बनवले जातात. गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत. यावेळी तुम्ही मोदकासह बासुंदीही (Basundi) करून पाहू शकता. मिठाईला आरोग्यदायी पर्याय म्हणून तुम्ही साखरमुक्त मोदक (Sugar Free Modak)  म्हणजेच शुगर फ्री मोदक आणि बासुंदी   (Basundi) बनवू शकता. हे दोन्ही पदार्थ बनवणे खूप सोपे आहे. त्यांची सोपी पद्धत जाणून घेऊया.

शुगर फ्री मोदकाचे साहित्य

1 कप खजूर, 10 मनुका,10 चिरलेले पिस्ता, 8 काजू, 8 चिरलेले बदाम, कप सुका नारळाचा किस, 2 टीस्पून खसखस, 2 चमचे तूप, 

मोदक बनवण्याची कृती 

कढईत तूप गरम करा. त्यात खसखस ​​घाला. ते चांगले मिसळा. आता त्यात सर्व ड्रायफ्रुट्स टाका. त्यांना चांगले मिसळा. मग त्यात नारळ पावडर घालून मिक्स करा. यानंतर खजूर ब्लेंडरमध्ये टाकून चांगले बारीक करून घ्या. आता सर्व मिश्रण चांगले मिसळा. मोदकांचे मिश्रण थंड होऊ द्या.

अधिक वाचा-  अंतराची मंगळागौर, मल्हारसोबत Romantic फोटोशूट

आता मोदकाचा साचा घ्या. त्याला तूप लावा. मिश्रण साच्यात घ्या आणि आकार द्या.  अशा प्रकारे सर्व मोदक तयार करा. मोदकांना वर खसखस ​​घालून सजवा.

शुगर फ्री बासुंदी 

अर्धा लीटर दूध, 2 हिरव्या वेलची, टीस्पून - जायफळ पावडर, 5 ग्रॅम - चारोळी, 5 ग्रॅम - चिरलेला काजू, 5 ग्रॅम - पिस्ता, केसर, चवीनुसार गूळ (पर्यायी)

बासुंदी बनवायची कृती 

एक मोठी कढई घ्या.  त्यात दूध घाला. त्यात वेलची आणि केशर घाला. मग जायफळ पावडर घाला. आता हे दूध अर्धे होईपर्यंत उकळवा. यानंतर त्यात चिरलेले काजू आणि भाजलेली चारोळी घाला. नंतर थंड किंवा गरम सर्व्ह करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी