Swami Samarth Punyatithi 2023 massages in marathi : भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची (Shree Swami Samarth)ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी असते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्वामी समर्थांना मानणारा वर्ग आहे. स्वामीच्या मठात जाऊन भक्ती भावाने पूजा करणारे अनेक भक्तगण आपल्या आसपास आहेत. त्यांची स्वामींवर असीम श्रद्धा आहे.
यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात. पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट (Akkalkot) येथील 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' दुपारी आपल्या अवतारकार्य स्वामींनी संपविले. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार यंदा 18 एप्रिल दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी (Swami Samarth Punyatithi) असल्याने त्यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस खास आहे.
दरवर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त नामजपासह आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोशल मीडियामध्ये आज फेसबूक (Facebook), व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) माध्यमातून स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या भक्तांसोबत खास मेसेज (Messages), स्वामी समर्थांचे संदेश, स्वामींचे फोटो (Swami Samarth Photos) शेअर करायचे असतील तर 'टाइम्स नाऊ मराठी' कडून तयार करण्यात आलेले हे काही खास इमेजेस तुम्हीच नक्कीच शेअर करू शकता.
अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. - स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त
कोटी कोटी प्रणाम!
ॐ नमो श्री भगवते स्वामी समर्थाय नम: ।
श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
सुमारे 19 व्या शतकामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी हे महाराष्ट्रात वास्तव्याला आले होते. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. अशी देखील धारणा आहे.