Swami Vivekanand Jayanti 2022 Wishes: स्वामी विवेकानंद जयंती निमित्त Messages, WhatsApp Status ठेऊन द्या शुभेच्छा

Swami Vivekanand Birth Anniversary । उद्या जगद्विख्यात संन्यासी स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. १२ जानेवारी १८६३ रोजी त्यांचा बंगालमध्ये जन्म झाला. त्यांचे मूळ नाव वीरेश्वर. १८८१ च्या नोव्हेंबरमध्ये सुरेंद्रनाथ नित्र यांच्या घरी काही भक्तिगीते म्हणण्याच्या निमित्ताने नरेंद्राची श्रीरामकृष्णांशी पहिली दृष्टिभेट झाली. कन्याकुमारीजवळच्या समुद्रात असलेल्या एका शिलाखंडावर ध्यानमग्न अवस्थेत बसलेले असताना या समाजाला जाग आणण्याचा संकल्प त्यांनी केला.

swami vivekanand jayanti 2022 images messages wishes in marathi for whatsapp status facebook twitter and instagram
थोडं पण कामाचं
  • १२ जानेवारी १८६३ रोजी स्वामी विवेकानंद यांचा बंगालमध्ये जन्म झाला.
  • त्यांचे मूळ नाव वीरेश्वर.
  • कन्याकुमारीजवळच्या समुद्रात असलेल्या एका शिलाखंडावर ध्यानमग्न अवस्थेत बसलेले असताना या समाजाला जाग आणण्याचा संकल्प त्यांनी केला.

Swami Vivekanand Jayanit Wishesh in Marathi :  उद्या जगद्विख्यात संन्यासी स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. १२ जानेवारी १८६३ रोजी त्यांचा बंगालमध्ये जन्म झाला. त्यांचे मूळ नाव वीरेश्वर. १८८१ च्या नोव्हेंबरमध्ये सुरेंद्रनाथ नित्र यांच्या घरी काही भक्तिगीते म्हणण्याच्या निमित्ताने नरेंद्राची श्रीरामकृष्णांशी पहिली दृष्टिभेट झाली. कन्याकुमारीजवळच्या समुद्रात असलेल्या एका शिलाखंडावर ध्यानमग्न अवस्थेत बसलेले असताना या समाजाला जाग आणण्याचा संकल्प त्यांनी केला.  विवेकानंद यांच्या जयंतीचे संदेश व्हॉट्सऍप, फेसकबुक, इन्स्टाग्रामवर शेअर करा

विवेकानंद हे एक द्रष्टे महापुरुष होते. धर्म हा भारतीय जीवनाचा मूलाधार आहे आणि विज्ञानयुगात होरपळणाऱ्या साऱ्या जगाला भारतातील अध्यात्मविचारामुळे शांती लाभणार आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी भारताला स्वतःच्या अस्मितेची जाणीव उत्पन्न करून दिली आणि पाश्चात्य जगाला भारताचा परिचय करून दिला.  भारतातील अध्यात्म आणि पाश्चात्यांचे आधुनिक विज्ञान यांच्या समन्वयातून उद्याची आदर्श मानवसंस्कृती उदयाला येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

                     Swami Vivekanand Jayanti 2022 Wishes । Photo : Times now Marathi 

                     Swami Vivekanand Jayanti 2022 Wishes । Photo : Times now Marathi 

                     Swami Vivekanand Jayanti 2022 Wishes । Photo : Times now Marathi 

                     Swami Vivekanand Jayanti 2022 Wishes । Photo : Times now Marathi 

बुद्धी व श्रद्धा, विचार आणि भावना, सामर्थ्य आणि करुणा, ऐहिक व आध्यात्मिक यांचा विवेकानंदांइतका उत्कृष्ट समन्वय दुसऱ्या कोणीही घातलेला नाही. भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारा व भविष्यातील समन्वयशील मानवसंस्कृतीची दिशा दाखवणारा असा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखविता येत नाही. १८९९ च्या जूनमध्ये विवेकानंद पुन्हा यूरोप अमेरिकेत गेले, ते १९०० च्या डिसेंबरमध्ये परत आले. त्याआधी दीड-दोन वर्षांपासून अविश्रांत परिश्रमामुळे त्यांचे शरीर थकत चालले होते. ४ जुलै १९०२ या दिवशी रात्री त्यांनी बेलूर मठात महासमाधी घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी