Swami Vivekananda Jayanti 2023: स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1853 मध्ये (Swami Vivekananda birth anniversary) कोलकाता येथे झाला. एका बंगाली कुटुंबात जन्मलेल्या स्वामी विवेकानंद यांचे नाव नरेंद्र नाथ दत्त (Narendra Nath Datta) होते. पण पुढे त्यांना स्वामी विवेकानंद नावाने ओळखले जावू लागले. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. (Swami Vivekananda Jayanti 2023 marathi speech marathi bhashan nibandh pdf)
सर्वांना माझा प्रणाम...
मित्र-मैत्रिणींनो... स्वामी विवेकानंद हे आपल्याला सर्वांना माहितीच आहेत. 12 जानेवारी या दिवशी त्यांची जयंती असते. त्यांच्या या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात थोडक्यात माहिती...
स्वामी विवेकानंद हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे, प्रतिष्ठित विद्वान, विचारवंत, लेखक होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. पण नंतर त्यांना स्वामी विवेकानंद या नावानेच ओळखले जावू लागले. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. नरेंद्रनाथ म्हणजेच स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांच्याविषयी अभ्यास केला.
हे पण वाचा : उत्साहाचा संचार करतील स्वामी विवेकानंदांचे विचार
आईचे संस्कार आणि वडिलांची असलेले सामाजिक बांधिलकी या सर्वांमुळे नरेंद्रनाथ यांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम झाला. यातूनच ते घडत गेले आणि नरेंद्र यांचे विवेकानंद असे नाव झाले. अनेकजण त्यांना आदराने स्वामीजी असे हाक मारत असतं.
हे पण वाचा : तुमच्या राशीच्या व्यक्तीची बुद्धी किती तल्लख? वाचा
स्वामी विवेकानंद यांनी जगभरात सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करत जगाला भारतीयांची ओळख करुन दिली. स्वामींनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
हे पण वाचा : काळ्या तांदळाचे उपाय करतील तुम्हाला मालामाल
स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे शिकागो येथे भरलेली सर्वधर्म परिषदेतील भाषण होय. या भाषणातून स्वामींनी सर्वांचीच मने जिंकली.
स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात माहिती देणारे हे लहानसे भाषण शालेय विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा किंवा इतर कार्यक्रमात करु शकतात.