Anxiety Symptoms: सतत चिंतातूर असण्याामागची ‘ही’ असतात कारणं, ओळखा आणि बाहेर पडा

सतत चिंता करण्याची सवय ही व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्यावरही विपरीत परिणाम करणारी ठरते. गेल्या काही वर्षात हे ताणतणाव वाढत असून, अनावश्यक चिंता करणे, आपल्या अस्तित्वाविषयी मनात शंका उत्पन्न होणे, स्वतःच्या भवितव्याविषयी अनिश्चितता दाटून येणे, आपल्या बाबत इतरांच्या मनात काय मते असतील, याचा अनावश्यक विचार करत राहणे किंवा सतत कुणाशी ना कुणाशी तुलना करत राहणे यासारख्या कारणांमुळे चिंताग्रस्तता वाढत चालल्याचे दिसून येते.

Anxiety Symptoms
सतत चिंतातूर असण्यामागे असतात ‘ही’ कारणं  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सतत चिंताग्रस्त असल्याचे मनावर आणि शरीरावरही होतात परिणाम
  • इतरांच्या मान्यतेचाच विचार केल्यामुळे सुरु होतो अँग्झायटीचा त्रास
  • स्वतःच्या क्षमतांबाबत सतत निर्माण होतात शंका

Anxiety Symptoms: गेल्या काही वर्षात बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे ताणतणावांचे (Anxiety) प्रमाण वाढत चालल्याचे चित्र दिसू लागलं आहे. अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या चिंतेने ग्रस्त असून त्यातून बाहेर पडणे, हे मोठे आव्हान प्रत्येकासमोर असल्याचे दिसते. सतत चिंता करण्याची सवय ही व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबरोबरच (Mental Health) शारीरिक आरोग्यावरही (Physical Health) विपरीत परिणाम करणारी ठरते. गेल्या काही वर्षात हे ताणतणाव वाढत असून, अनावश्यक चिंता करणे, आपल्या अस्तित्वाविषयी मनात शंका उत्पन्न होणे, स्वतःच्या भवितव्याविषयी अनिश्चितता दाटून येणे, आपल्या बाबत इतरांच्या मनात काय मते असतील, याचा अनावश्यक विचार करत राहणे किंवा सतत कुणाशी ना कुणाशी तुलना करत राहणे यासारख्या कारणांमुळे चिंताग्रस्तता वाढत चालल्याचे दिसून येते. अनेकांना आपण अति चिंता करत आहोत, हे लक्षातही येत नाही. मात्र त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत असतो. जाणून घेऊया एखादी व्यक्ती चिंताग्रस्त असल्याची कुठली लक्षणे असतात आणि त्यामागे काय कारणे असतात, याबाबत.

इतरांना खुश करण्याची चिंता

चिंतातूर असणाऱ्या व्यक्ती या स्वतः आनंदी राहण्यापेक्षा इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. आपल्या एखाद्या कृत्याने किंवा कामाने इतर व्यक्ती खुश होते की नाही, यावर त्या व्यक्तींचा आनंद अवलंबून असतो. इतरांच्या प्रतिक्रियांवर अशा व्यक्ती अवलंबून असल्याने त्या सतत चिंताग्रस्त असतात. अशा व्यक्ती आपल्या कामाचा आणि त्या प्रक्रियेचा आनंद घेऊ शकत नाहीत.

नकार देण्याचे आव्हान

इतरांना नकार देण्यास मनाची तयारी नसणे, हेदेखील या मानसिक आजारामागील प्रमुख कारण मानले जाते. अशा व्यक्तींच्या प्राधान्यक्रमामध्ये स्वतःपेक्षा इतर व्यक्तींना वरचे स्थान असते. स्वतःचे मन दुखावूनदेखील इतर व्यक्तींना खुश ठेवण्याचा प्रयत्न अशा व्यक्ती करत असतात. याचा साहजिकच त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि त्यांची चिंताग्रस्तता वाढत राहते.

अधिक वाचा - Happy Kartik Purnima 2022 : कार्तिक पौर्णिमेनिमित्त Facebook, WhatApp, Twitter, Instagram आणि Social Media वर मराठीतून द्या शुभेच्छा

स्वतःवर विश्वास नसणे

नवे प्रयोग करणारी प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या चुका करतच असते. मात्र आपण केलेल्या एखाद्या चुकीमुळे अशा व्यक्तींचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. या व्यक्ती मग इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहू लागतात. त्यामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेवरही परिणाम होतो.

सततचा थकवा

काही व्यक्तींच्या दिनचर्येत बदल झाल्यामुळे त्यांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तींना कमी झोप लागणे, भूक कमी होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. त्यातून निद्रानाशाचा त्रास सुरू होतो. अशा अवस्थेत मनात अनेक विचार रुंजी घालत असताना, प्रत्यक्षात कुठल्याच विचारांवर कृती होत नाही. या कारणामुळे अनेक व्यक्ती मानसिक तणावात जातात आणि चिंतातूर होतात. 

अधिक वाचा - Happy Kartik Purnima 2022 : कार्तिक पौर्णिमेनिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठीतून द्या शुभेच्छा

शेअरिंग न करणे

आपण किती आनंदी आहोत, हे दाखवण्यातच अनेकांना रस असतो. अशा व्यक्ती आपली खरी दुःखे इतरांसोबत शेअरच करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या दुःखाला व्यक्त होण्यासाठी कुठलेही मार्ग मिळत नाहीत. अशा व्यक्तींचे दुःख मनात साठत जाते आणि त्याचा योग्य प्रकारे निचरा न झाल्यामुळे मानसिक समस्या वाढत जाते.

डिस्क्लेमर - अँग्झायटीची लक्षणे व कारणे याबाबतच्या सामान्यज्ञानावर आधारित असणाऱ्या या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी