मुंबई : एप्रिल (April) महिना हा ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. एकीकडे या महिन्यात सर्व नऊ ग्रह आपापल्या राशी बदलत आहेत तर दुसरीकडे महिन्याच्या शेवटच्या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar eclipse) होणार आहे. ज्योतिषनुसार, शनिवार, ३० एप्रिल २०२२ रोजी वृषभ राशीमध्ये ग्रहण होणार आहे, जे सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण मध्यरात्री १२:१५ वाजता सुरू होईल आणि पहाटे ०४:०७ वाजता संपेल. पाहुया इतर मान्यता आणि सूतक काळ वेळ..
हे आंशिक सूर्यग्रहण असेल आणि ते भारतात दिसणार नाही. ज्या ठिकाणी ग्रहण दिसत नाही, तिथे सुतक काळही वैध नाही, असे ज्योतिष तज्ज्ञ आणि धार्मिक तज्ज्ञांचे मत आहे. जेव्हा चंद्र सूर्याला अर्धवट झाकतो तेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास कमी सक्षम असतात. या स्थितीला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात. दरम्यान, हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या नैऋत्य भागात, पॅसिफिक महासागर, अंटार्क्टिका आणि अटलांटिक प्रदेशात हे दृश्यमान असेल.
धर्माचे ज्ञान असलेले लोक सांगतात की, ग्रहणानंतर स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही गंगा नदीत स्नान केले तर ते खूप फायदेशीर आहे आणि जर गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर तुम्ही घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून देखील स्नान करू शकता. शास्त्रीयदृष्ट्याही ग्रहणानंतर स्नान करणे आवश्यक आहे.