Fruit Personality Test: तुमचे आवडते फळ सांगते तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही... पाहा कसे

Personality Test : प्रत्येकाचे स्वत:चे असे एक फेवरेट फळ हे असतेच. काहींना आंबा आवडतो. तर काहींना सफरचंद आवडतात. काहींना रसाळ फळे आवडतात. आरोग्यासाठी फळांचा फायदा मोठा असतो. त्यामुळे तुम्ही नियमितपणे फळे खाल्ली पाहिजेत असे तज्ज्ञ सांगतात. मात्र फळांचे हे माहात्म्य फक्त आरोग्यापुरतेच नसते तर तुम्हाला आवडणारे फळ तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल देखील बरेच काही सांगते.

Personality test
फळांवरून जाणा व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये 
थोडं पण कामाचं
  • फळे किंवा फळांचा रस हा प्रत्येकालाच आवडतो.
  • प्रत्येकाचे स्वत:चे असे एक फेवरेट फळ असते
  • तुमच्या आवडीचे फळ तुमच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती देते

Fruit Personality Test : नवी दिल्ली : खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. मात्र फळे (Fruits) प्रत्येकालाच आवडतात. फळे किंवा फळांचा रस हा प्रत्येकालाच आवडतो. अर्थात प्रत्येकाचे स्वत:चे असे एक फेवरेट फळ हे असतेच. काहींना आंबा आवडतो. तर काहींना सफरचंद आवडतात. काहींना रसाळ फळे आवडतात. एकीकडे फळे किंवा फळांचा रस हे अतिशय स्वादिष्ट किंवा मधुर असतात. तर दुसरीकडे त्यातून मिळणारे पोषक घटकदेखील मोठे असतात. आरोग्यासाठी फळांचा फायदा मोठा असतो. त्यामुळे तुम्ही नियमितपणे फळे खाल्ली पाहिजेत असे तज्ज्ञ सांगतात. त्या त्या सीझनची फळे आवर्जून खाल्ली पाहिजेत. पण फळांचे हे माहात्म्य फक्त आरोग्यापुरतेच नसते तर तुम्हाला आवडणारे फळ तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल (Fruit Personality Test) देखील बरेच काही सांगते. तुम्हाला जे फळ आवडते त्यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाची (Personality) बरीच वैशिष्ट्ये ओळखता येतात. तुमचे आवडते फळ तुमच्याबद्दल काय माहिती देते हे पाहणे फारच रंजक आहे, जाणून घेऊया. (The fruit you like tells a lot about yur personality read in Marathi)

अधिक वाचा : Healthy drinks for winter : हिवाळ्यात ही पेये तुम्हाला ठेवतील निरोगी, शिवाय त्वचादेखील होईल चमकदार

पाहूया तुमच्या आवडीचे फळ तुमच्याबद्दल काय सांगते -

सफरचंद
सफरचंद आवडणाऱ्यांची संख्या जगात सर्वात जास्त आहे. जगभरात हे फळ आवडीने खाल्ले जाते. रोग्यासंदर्भातदेखील याचे फायदे आहेत. तुम्ही रोज सफरचंद खाल्ले तर डॉक्टरजवळ जाण्याची गरज राहणार नाही अशी एक म्हणदेखील आहे. सफरचंदामध्ये फायबर आणि लोह असते. ज्या लोकांना सफरचंद आवडते ते लोक आरोग्याबद्दल जागरुक असतात. अशा लोकांना नेहमी फिट राहायला आवडते. ते अतिशय शिस्तबद्ध असतात. आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंदर्भात ते सजग असतात. शिवाय असे लोक स्पष्टवक्ते असतात, ते उत्तम संवाद साधतात. असे लोक जीवनाचा आनंद घेत तो वाटतात आणि उत्साह वाढवतात.

संत्री
संत्रे हे एक बहुगणी फळ आहे. अर्थात हे फळ खाताना साल काढावी लागते, त्यानंतर बियादेखील काढाव्या लागतात. त्यामुळे हे फळ लगेच तोंडात टाकले असे नसते. यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. ज्या लोकांना संत्र्याचे फळ आवडते ते धैर्यवान आणि दृढनिश्चियी लोक असतात. ते नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. ते खोटी वचने देत नाहीत. शिवाय ते विचारी आणि विश्वासार्ह असतात.

आंबा
आंबा तर फळांचा राजा असतो. आंबा म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. जगात सर्वात जास्त आवडणाऱ्या फळांपैकी हे एक फळ आहे. ज्या लोकांना आंबा आवडतो ते स्वभावाने हट्ट असतात. त्यांच्यावर प्रभाव टाकणे अवघड असते. शिवाय हे लोक आपल्या मुद्द्यांवर ठाम असतात. आंबा आवडणारे लोक तार्किक असतात. ते निर्णय घेताना भावनांपेक्षा जास्त तर्कशुद्धपणे विचार करतात.

अधिक वाचा : या आहेत 2023 मधील लकी राशी, होईल पैशांचा वर्षाव

टरबूज
टरबूज हे खास उन्हाळ्यात आवडीने खाल्ले जाणारे फळ आहे. टरबूज आवडणारे लोक अत्यंत मेहनती आणि हुशार असतात. त्याचबरोबर असे लोक सर्जनशील आणि बुद्धिमानदेखील असतात.

नाशपाती
हे फळ आवडणारे लोक ऊर्जावान असतात. अशा लोकांना एका जागी बसून राहण्यास अडचण होते. त्यांना सतत काहीना काही करायचे असते. ते लगेच नाराज किंवा बेचैन होतात. अनेक कामे सुरू करून ती शेवटापर्यत ते क्वचितच नेतात. या लोकांमध्ये ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते. या लोकांमध्ये सहानुभूती, संवेदनशीलता आणि हसतमुख राहण्याचा गुण असतो.

लिंबू
लिंबू हे फळ आपल्या आहाराचाच एक भाग आहे. ज्या लोकांना लिंबू आवडतो त्या लोकांना स्वच्छता आवडते आणि ते त्याला खूप महत्त्व देतात. ते आपले घर, कामाचे ठिकाण स्वच्छ ठेवतात. ते खूप सर्जनशील असतात.

अधिक वाचा - बायकांवर नवऱ्याकडूनच लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार, धक्कादायक आकडेवारीनं महिलांची वाढली चिंता

चेरी
चेरी आवडणारे लोक अनेकदा अंतर्मुख असतात. ते खूप लाजाळू असतात. ते आपल्या भावना इतरांजवळ सहजासहजी व्यक्त करत नाहीत. अर्थात ज्यांच्याशी त्यांचे सूर जुळतात त्यांच्याशी हे लोक प्रेमळपणे वागतात. यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणीही शंका व्यक्त करत नाही. हे लोक उत्स्फूर्त असतात. 

केळी
केळी आवडणारे लोक सकारात्मक विचारांचे असतात. हे लोक दयाळू असतात. त्यांना इतरांबरोबर मिसळायला आवडते. केळी आवडणारे लोक स्वभावाने विनम्र असतात. जे लोक कोणतीही गोष्ट लगेच शिकतात. यांच्यात आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता असते. हे लोक अतिशय प्रमाणिक असतात आणि दीर्घकाळ नाती जपतात.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी