Love tips : मुलगी प्रेमात पडल्याचे लगेच कळते, पण मुलं प्रेमात पडतात तेव्हा काय करतात.?

Love tips : प्रेम हा असा शब्द आहे ज्याचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही. प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण बदलून जातो. मुली जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्या काय काय करतात यावर बरंचस लिहिलं जात. मात्र जेव्हा एखादा मुलगा खऱ्या प्रेमात पडतो तेव्हा काय होत?

मुलगी The girl immediately knows that she has fallen in love, but what do boys do when they fall in love?
प्रेमात पडल्याचे लगेच कळते, पण मुलं प्रेमात पडतात तेव्हा काय करतात.? ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जेव्हा मुलींच्या कोणीतरी प्रेमात पाडते तेव्हा त्यांचे वागणे बदलते,
  • प्रेमात पडल्यानंतर मुलं काय करतात
  • प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण बदलून जातो.

Love tips मुंबई : प्रेम ही जगातील सर्वात अद्भुत भावना आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा तुमचे संपूर्ण जगच बदलून जाते. आपण अनेकदा मुलींना पाहिलं आहे की जेव्हा त्या एखाद्याच्या प्रेमात पडतात तेव्हा त्या स्वतःला पूर्णपणे आपल्या जोडीदारासाठी झोकून देतात, पण इथे प्रश्न पडतो की मुलं प्रेमात पडतात तेव्हा काय करतात.कारण त्यांना स्वतःला फारसं व्यक्त करता येत नाही. (The girl immediately knows that she has fallen in love, but what do boys do when they fall in love?)


स्वतःला विसरुन जातात

जेव्हा मुले एखाद्याच्या प्रेमात पडतात तेव्हा ते विसरून जातात की आपण खरोखर कोण आहोत. त्यांचे एकच लक्ष असते आणि ते म्हणजे जोडीदारासोबत आयुष्य घालवणे. याशिवाय तो असे सगळे विसरून जातो. जर एखादा मुलगा एखाद्या मुलीसोबत राहण्याचा खूप प्रयत्न करत असेल तर समजून घ्या की त्या मुलीवर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम कोणीच करू शकणार नाही.

नात्यात बांधण्याची भीती

मुलांना कोणत्याही नात्यात बांधण्याची भीती असते, पण जेव्हा ते एखाद्याच्या खर्‍या प्रेमात पडतात तेव्हा त्या मुलीशी नातं जोडण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत आणि दुसऱ्या मुलीकडे ढुंकूनही पाहत नाहीत. असे करणे हे त्यांच्या प्रेमाचे वैशिष्ट्य आहे.

आयुष्यच बदलून जातं

जेव्हा प्रेम होते तेव्हा झोप उडते. मध्यरात्रीपर्यंत आपल्या गर्लफ्रेंडसोबत चॅटिंग किंवा फोनवर बोलत असतात. कॉल झाल्यानंतरही विचार करत असतात. आरश्यात स्वतःला पाहत बसणे आणि लाजणे हे प्रेमाचे एक लक्षण आहे. रिलेशनशिपमध्ये असणारे स्वतःतच मग्न असतात.
प्रेमात पडल्यानंतर प्रत्येक लव्हस्टोरी आपल्या लव्हस्टोरी प्रमाणे दिसते. ते प्रत्येक वेळी रोमँटुक सॉन्ग्स ऐकत असतात. रॉक म्यूजिक ऐवजी त्यांची म्यूजिक लायब्रर रोमँटीक गाण्यांने भरते. मोबाइलची रिंगटोनही लव्ह सॉन्ग्स बनते. रिलेशनशिपमध्ये पडल्यानतंर रोमँटीक मूव्हीज त्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये येतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी