Toilet Vastu: घराच्या 'या' ठिकाणी शौचालय बांधलेल्यास होते मोठे नुकसान, घरमालकाच्या डोक्यावर कायम राहत कर्जाचे ओझं

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Oct 18, 2022 | 15:43 IST

Vastu Tips for Toilet: प्रसाधनगृह कितीही सुंदर असले तरी ते वास्तूच्या ऊर्जा नियमांनुसार बांधले नाही तर त्यातून नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे तेथील रहिवाशांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यावरही परिणाम होतो.  मुलांचे करिअर आणि कौटुंबिक नातेसंबंधांवरही परिणाम होतो.

Vastu Tips for Toilet
घराच्या 'या' ठिकाणी शौचालय बांधलेल्यास होते मोठे नुकसान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टॉयलेट दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम दिशेत बनवणं हे चांगले मानले जाते.
  • समजा घरामध्ये उत्तर-पश्चिम दिशेला शौचालय बांधले असेल आणि ते काढणे शक्य नसेल तर त्या ठिकाणी नेहमी पांढरा रंग लावा.
  • शौचालय कधीच उत्तर-पश्चिम दिशेला बांधू नये.

Vastu Tips for Toilet: वास्तुशास्त्रात (Vastu Shastra) घराच्या प्रत्येक भागासाठी आणि दिशांना नियम दिलेले आहेत. घरातील प्रत्येक खोली ही वास्तुशास्त्रात दिलेल्या निर्देशानुसार बनवावी. किचनपासून ते  बेडरुमसह वास्तुशास्त्रात शौचालय बांधण्याची योग्य दिशा सांगण्यात आली आहे. शौचालय चुकीच्या दिशेने बनवल्यास जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.  (The one who built the toilet in 'this' place of the house incurs huge losses, the burden of debt)

अधिक वाचा  : केदारनाथजवळ कोसळलं आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर

प्रसाधनगृह कितीही सुंदर असले तरी ते वास्तूच्या ऊर्जा नियमांनुसार बांधले नाही तर त्यातून नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे तेथील रहिवाशांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यावरही परिणाम होतो.  मुलांचे करिअर आणि कौटुंबिक नातेसंबंधांवरही परिणाम होतो.

शौचालय बनवण्याचे नियम

वास्तुशास्त्रानुसार विसर्जनासाठी दक्षिण-दक्षिण-पश्चिम दिशा सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे या दिशेने शौचालय बांधणे वास्तुच्या दृष्टीने योग्य आहे. शौचालय कधीच उत्तर-पश्चिम दिशेला बांधू नये दरम्यान, शौच खड्डे त्या भागात बनवू शकतात.  याचप्रमाणे नाईलास्तव शौचालय उत्तर-पश्चिम भागात बनवावे लागत असेल तर त्याला कोणत्यातरी एका बाजुला करून घ्यावे. 

अधिक वाचा  : पुण्यात वाढल्या सेक्सटोर्शनच्या घटना,सायबर सेल अलर्ट मोडवर

टॉयलेट दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम दिशेत बनवणं हे चांगले मानले जाते. कारण याला विसर्जनाची दिशा म्हटलं जातं. या दिशेने सीवेज पाइपलाइन काढून टाकणे देखील चांगले आहे. जर वायव्य दिशेला शौचालय बांधले असेल तर नेहमी कर्ज राहते, त्यामुळे कर्ज घेणे टाळलेलेच बरे. जर काही कारणास्तव कर्ज घ्यावे लागले तर अशा दिवशी किंवा नक्षत्रात घ्या की ते सहज फेडता येईल. घरातील शौचालयाची चुकीची दिशा वडिलांसोबतचे नाते बिघडवते. अशा घरात भाडेकरू ठेवल्यानेही अनेक समस्या निर्माण होतात. समजा घरामध्ये उत्तर-पश्चिम दिशेला शौचालय बांधले असेल आणि ते काढणे शक्य नसेल तर त्या ठिकाणी नेहमी पांढरा रंग लावा. तसेच या दिशेला पांढऱ्या फुलांची भांडी ठेवा.

पूर्व दिशा

पूर्व दिशा सूर्याशी संबंधित आहे. ती समाज संबंधाविषयी दिशा आहे. त्यामुळे या दिशेला स्वच्छतागृहे असल्याने समाज संबंध बिघडत असतात.  परंतु या दिशेला स्नानगृह शुभ मानले जाते.

आग्नेय दिशा

या दिशेला शौचालय बांधल्याने जीवनातील अडचणी वाढतात. या दिशेला शौचालय असल्‍याने मंगलकार्यात अडथळे येऊ शकतात आणि धनाच्या आगमनातही अडथळा निर्माण होऊ शकतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी