Vastu Tips: दुकान चालत नाही, व्यवसायात येत नाही यश मग बदलून पहा ऑफिसचा रंग; रंगामध्ये आहे यशाचं रहस्य

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Oct 13, 2021 | 15:24 IST

Business Success Vatu Tips: कुटुंबासाठी आणि जीवनासाठी व्यवसाय महत्वाचा आहे. परंतु कोरोनाच्या काळात बहुतेक लोकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला.

business doesn't succeed then change the color of the office
Vastu Tips: व्यवसायात येत नाही यश मग बदलून पहा दुकानाचा रंग  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अनेक व्यवसाय नीट न चालल्याने केवळ आर्थिक समस्याच नाही तर मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते.
  • आपल्या दुकानाचे रंग किंवा कार्यलायातील काही रंगांची काळजी घेऊन, तुम्ही तुमचा व्यवसाय पुन्हा यशाच्या मार्गावर नेऊ शकता.
  • जर तुमचा व्यवसाय वाढत नसेल, तर काळा रंग वापरून व्यवसायातील अडथळे दूर करता येतात.

नवी दिल्ली : Business Success Vatu Tips: कुटुंबासाठी आणि जीवनासाठी व्यवसाय महत्वाचा आहे. परंतु कोरोनाच्या काळात बहुतेक लोकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. ज्यांनी काही काळापूर्वी आपला व्यवसाय सुरू केला, ते यशस्वी होण्यासाठी खूप आटापिटा केला कठोर परिश्रम केली आहे. परंतु तरीही त्यांना यश मिळाले नाही, यामुळे निराश झाले आहेत. पण वाचकांनो निराश होण्याची गरज नाही. यावर तुम्ही वास्तुशास्त्राचा उपाय करणं आवश्यक असते. 
अनेक व्यवसाय नीट न चालल्याने केवळ आर्थिक समस्याच नाही तर मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. अशा स्थितीत वास्तुशास्त्र सांगते की कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

अनेकवेळा, सर्व प्रयत्नांनंतरही, जर तुम्हाला यश मिळत नसेल, तर समजून घ्या की वास्तु दोषामुळे तुमचा व्यवसाय कमी होत आहे किंवा वाढ थांबली आहे. अशा परिस्थितीत, आपल्या दुकानाचे रंग किंवा कार्यलायातील काही रंगांची काळजी घेऊन, तुम्ही तुमचा व्यवसाय पुन्हा यशाच्या मार्गावर नेऊ शकता. आपल्या व्यवसायाशी रंगांचा काय संबंध आहे ते आपण समजून घेऊ.

व्यवसायानुसार कार्यालय रंगवा

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व असते. जर तुमचा व्यवसाय वाढत नसेल, तर काळा रंग वापरून व्यवसायातील अडथळे दूर करता येतात. वास्तुनुसार दक्षिण-पूर्व दिशेला काळा रंग वापरणे चांगले. असे म्हटले जाते की काळ्या रंगाचा घटक पाणी आहे. जर दक्षिण- पूर्व दिशेत काही प्रमाणात काळा रंगा लावला तर त्या दिशेला असलेल्या तत्वांना मदत मिळेल.  जर बिझनेस अजिबात वाढत नसेल, आणि घरची मोठी मुलगी त्रासलेली असेल, किंवा कंबर किंवा नितंबात काही समस्या असेल तर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण-पूर्व दिशेच्या भिंतीवर खालच्या बाजुला थोडा काळा रंग लावून घ्यावा. 

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही दागिन्यांचा व्यवसाय करत असाल, तर तुमच्या दुकानाचा रंग गुलाबी, पांढरा आणि आकाश निळा असावा. जर तुम्ही  किराणा दुकान चालवत असाल तर हलका गुलाबी, आकाश आणि पांढरा यातील कोणताही रंग निवडून तुमच्या दुकानाला लावू शकता. असे मानले जाते की हे रंग व्यवसायात समृद्धी आणि समृद्धी आणतात.

जर तुम्ही कपड्यांचा व्यवसाय करत असाल किंवा तुमच्याकडे बुटीक असेल तर हलका पिवळा, हिरवा आणि आकाश रंग निवडणे चांगले. यासोबतच स्टेशनरी विक्रेते असाल तर तुमच्या दुकानाला पिवळा, आकाशी आणि गुलाबी रंग द्यावा.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी