Vastu : दक्षिणमुखी बंगला, घर असणं मानलं जातं अशुभ; तुमचेही घर असेल दक्षिणमुखी तर करा 'हे' उपाय, घरात येईल सुख

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Sep 30, 2021 | 09:31 IST

वास्तुशास्त्रात उत्तरमुखी घराला किंवा दुकानाला सर्वात जास्त शुभ मानले जाते. तर दक्षिणमुखी घराला किंवा बंगल्याला अशुभ मानले जाते.

The south-facing house is considered inauspicious
Vastu : दक्षिणमुखी बंगला, घर असणं मानलं जातं अशुभ  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • ज्या लोकांचे घर हे दक्षिणमुखी असेल तर वास्तू दोष संपविण्यासाठी त्यांना काही उपाय करणे आवश्यक आहे.
  • दक्षिण दिशेत मंगल ग्रहाचा प्रभाव असतो. अशा घरात राहणाऱ्या दोन भावांमध्ये वाद होत असतात.
  • दक्षिणमुखी घराच्या मुख्य दाराजवळ निंबाचे झाड लावावे.

नवी दिल्ली :  वास्तुशास्त्रात उत्तरमुखी घराला किंवा दुकानाला सर्वात जास्त शुभ मानले जाते. तर दक्षिणमुखी घराला किंवा बंगल्याला अशुभ मानले जाते. दरम्यान असे काही उपाय आहेत जे केल्याने आपल्याय दक्षिणमुखी घरातही सुख नांदू शकते. ज्या लोकांचे घर हे दक्षिणमुखी असेल तर वास्तू दोष संपविण्यासाठी त्यांना काही उपाय करणे आवश्यक आहे. लाल पुस्तकात याविषयी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊ दक्षिणमुखी घरामुळे कोणते नुकसान होऊ शकतात आणि त्यापासून आपण आपला बचाव कसा करू शकतो. 

दक्षिणमुखी घरात राहिल्यानंतर होणारे नुकसान 

दक्षिण दिशेत मंगल ग्रहाचा प्रभाव असतो. अशा घरात राहणाऱ्या दोन भावांमध्ये वाद होत असतात. याशिवाय शरीरात रक्तासंबंधी विकार होत असतात. जमिनीवरुन वाद होत असतात. 

दरवाजावरती लावा हनुमानाचा फोटो

घराच्या दारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा. यामुळे वास्तू दोष कमी होत असतो.

निंबाचे झाड लावा

दक्षिणमुखी घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दार ज्या आकाराचे असेल  त्यााच्या दुप्पट अंतरावर निंबाचे झाड लावा. असे केल्याने मंगळचा वाईट प्रभाव संपतो. जर घराच्या समोर जर मोठी इमारत असली तर मंगळचा प्रभाव कमी होत असतो.

आरसा लावा

जर दक्षिणाभिमुख घर असेल तर दारासमोर मोठ्या आकाराचा आरसा अशा प्रकारे ठेवा घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची पूर्ण प्रतिमा आरशात बनेल. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा परत जाते.

गणेश जीच्या 2 प्रती स्थापित करा

गणेश जीच्या 2 दगडी मूर्ती अशाप्रकारे लावा की त्यांची पाठ एकमेकांना जोडलेली असेल. मुख्य मूर्तीच्या मध्यभागी दरवाजाच्या चौकटीवर अशी मूर्ती ठेवा. यामुळे घरातील भांडणेही संपतील.

(नोट: या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी