Relationship Tips: घरी कांदे पोहेचा कार्यक्रम आहे; मग करा ही चार कामे , लगेच धराल लग्नाची तारीख

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Oct 30, 2022 | 19:23 IST

सुरुवातीच्या दिवासातच सासरच्या घरच्यांना खूश करणं शक्य नाही झालं तर त्यांचा विश्वास संपादित करणं अवघड होत असते. पहिल्यांदा तुम्ही तुम्हीच्या कृतीतून होऊ घातलेल्या सासरच्या लोकांना पटवलं नाही तर लग्न होणं शक्य नसतं. समजा झालं तरी इम्प्रेस करणं मात्र अशक्य असतं. यामुळे आयुष्य चांगले बनवायचे असेल तर सासू-सासऱ्यांवर प्रभाव टाकणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

Relationship Tips
घरी कांदे पोहेचा कार्यक्रम आहे; मग करा ही चार कामे   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तुमच्या जोडीदाराला बहीण किंवा लहान भाऊ असेल तर तुम्ही त्याच्या आवडीची चॉकलेट देऊ शकता.
  • लग्नाआधी सासरच्या लोकांना इम्प्रेस करणं खूप महत्त्वाचं असतं.
  • जोडीदाराच्या कुटुंबाला पहिल्यांदा भेटणार असाल तर घाबरू नका.

मुंबई : विवाह म्हटला तर यात पती-पत्नीचं (husband and wife) नातं नसतं तर या नात्यात दोन कुटुंब (family) जोडली जात असतात. लग्नानंतर (marriage) सासू-सासऱ्यांसोबतच सासरही आपलं घर बनत असतं. लग्नाआधी सासरच्या लोकांना इम्प्रेस (Impress) करणं खूप महत्त्वाचं असतं. सुरुवातीच्या दिवासातच सासरच्या घरच्यांना खूश करणं शक्य नाही झालं तर त्यांचा विश्वास संपादित करणं अवघड होत असते. पहिल्यांदा तुम्ही तुम्हीच्या कृतीतून होऊ घातलेल्या सासरच्या लोकांना पटवलं नाही तर लग्न होणं शक्य नसतं. समजा झालं तरी इम्प्रेस करणं मात्र अशक्य असतं. यामुळे आयुष्य चांगले बनवायचे असेल तर सासू-सासऱ्यांवर प्रभाव टाकणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. (Then do these four things, you will immediately get the date of marriage)

अधिक वाचा  :  या सोप्या टिप्ससह मिळवा Flat Tummy

सासरच्यांबद्दल आधीच माहिती घ्या

सासरच्या लोकांसमोर त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या समोर जा. तुमच्या जोडीदाराकडून तुमच्या सासरच्या लोकांच्या आवडीनिवडी आधीच जाणून घ्या.  त्यांना आवडत नसलेल्या गोष्टी केल्याने तुम्ही त्यांच्या डोळ्यात याल. 

कपड्यांची काळजी घ्या

कपड्यांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम होतो. आपली प्रतिमा तयार करण्यात कपडे महत्त्वाची भूमिका बजावतात. कधी-कधी आपल्या आवडीचे कपडे सासरच्यांना वाईट वाटू शकतात. कदाचित तुमच्या जोडीदाराचे कुटुंब आधुनिक विचारसरणीचे नसेल, अशात जर तुम्ही काही स्टायलिश आणि मॉडर्न ड्रेस घालून भेटायला गेलात, तर तुमची गोष्ट बिघडू शकते. म्हणून आधी त्यांच्याबद्दल जाणून घ्या मग कपडे आधुनिक किंवा पारंपारिक परिधान करायचे ते ठरवा.

अधिक वाचा  : Video: 'फायर स्टंट' करणं पडलं महागात

स्मित हास्य ठेवा

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाला पहिल्यांदा भेटणार असाल तर घाबरू नका तर चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवा. हसरा चेहरा प्रत्येकाला आपलसं करत असतो. 

भेटवस्तू दिल्याने होईल फायदा 

पहिल्या भेटीतच खूश करायचे असेल तर सासरच्या मंडळींना भेटवस्तू द्या. तुम्ही तुमच्या सासूबाईंना तुमच्या आवडीची साडी किंवा पुस्तके देऊ शकता.  सासरच्यांना काही मिठाई देता येईल. जर तुमच्या जोडीदाराला बहीण किंवा लहान भाऊ असेल तर तुम्ही त्याच्या आवडीची चॉकलेट देऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी