आर्थिक चणचण आहे, या चुकांमुळे घरात राहत नाही लक्ष्मी माता! होतं पैशाचं नुकसान

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Mar 30, 2022 | 13:41 IST

श्रीमंत होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी माणूस आपल्या वतीने कठोर परिश्रम देखील करतो, परंतु काहीवेळा यामुळे आर्थिक जीवनात समृद्धी येत नाही. दरम्यान, वास्तूशास्त्रानुसार घरातील छोट-छोट्या चुकींमुळे सुख-शांती नाहीसा होत असते.

There is financial crisis
वास्तूमधील 'या' चुकांमुळे घरात येते गरिबी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वास्तूंमधील या चुकींमुळे घरात नकारात्मकता येत असते.
  • भिंतीवर बंद पडलेल्या घड्याळातून घरात नकारात्मक ऊर्जा येते

नवी दिल्ली: श्रीमंत होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी माणूस आपल्या वतीने कठोर परिश्रम देखील करतो, परंतु काहीवेळा यामुळे आर्थिक जीवनात समृद्धी येत नाही. दरम्यान, वास्तूशास्त्रानुसार घरातील छोट-छोट्या चुकींमुळे सुख-शांती नाहीसा होत असते. वास्तूंमधील या चुकींमुळे घरात नकारात्मकता येत असते. परिणामी आर्थिक नुकसान होते. चला तर वास्तुच्या अशा कोणत्या चुका आहेत ज्यातून आपल्याला नुकसान होतं त्या आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

या चुकांमुळे मिळत नाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद 

वास्तुशास्त्रानुसार, भिंतीवर बंद पडलेल्या घड्याळातून घरात नकारात्मक ऊर्जा येते. अशा परिस्थितीत घरात कधीही बंद किंवा तुटलेले घड्याळ ठेवू नये. याशिवाय टेबलावर बंद पडलेल्या घड्याळातूनही घरात नकारात्मक ऊर्जा वाहू लागते. यामुळे घड्याळ त्वरित दुरुस्त केल्या पाहिजे.
घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यात वाळलेली झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळेच वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, घरात कोरडी झाडे नसावीत.

Read Also : अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास लगेचच करा ही ३ कामे, मिळेल आराम

वास्तुशास्त्रानुसार घरातील नळातून टपकणारे पाणी, पाईपमधून वाहणारे पाणी किंवा अनावश्यक पाण्याचा अपव्यय यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. अशा वास्तुदोषांमुळे पैशाचा नाहीसा होत असतो. 

Read Also : ...म्हणून गुढीपाडवा साजरा करतात

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. घर स्वच्छ ठेवल्याने सुख-समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी वास करते. दुसरीकडे, घर अस्वच्छ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. तसेच आर्थिक नुकसानही होते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी