Chanakya Niti: या ३ मोठ्या चुका माता लक्ष्मीला तुमच्यापासून ठेवतात दूर, आजपासूनच घाला आळा

लाइफफंडा
Updated May 14, 2022 | 09:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chanakya Niti In Marathi | आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार व्यक्तीला धनप्राप्तीसाठी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक असते. धन-संपत्तीची देवता लक्ष्मी आहे आणि कलियुगात माता लक्ष्मीचे विशेष स्थान आहे.

These 3 big mistakes keep Mother Laxmi away from you 
या ३ मोठ्या चुका माता लक्ष्मीला तुमच्यापासून ठेवतात दूर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार व्यक्तीला धनप्राप्तीसाठी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक असते.
  • धन-संपत्तीची देवता लक्ष्मी आहे आणि कलियुगात माता लक्ष्मीचे विशेष स्थान आहे.
  • आचार्य चाणक्य म्हणतात की लक्ष्मी नेहमी आळशी व्यक्तीपासून दूर राहते.

Chanakya Niti In Marathi | मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार व्यक्तीला धनप्राप्तीसाठी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक असते. धन-संपत्तीची देवता लक्ष्मी आहे आणि कलियुगात माता लक्ष्मीचे विशेष स्थान आहे. माणसावर लक्ष्मीची कृपा असेल तर धनाची प्राप्ती होते. माता लक्ष्मीचे आशिर्वाद सुख-समृद्धीही देतात. पैसा आला की माणसाचा विकास होतो आणि समाजात मान-सन्मान मिळतो. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती काही चुका करू लागते तेव्हा माता लक्ष्मी त्यांचा तिरस्कार करते आणि त्यांच्यापासून दूर राहते. (These 3 big mistakes keep Mother Laxmi away from you). 

अधिक वाचा : पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर RCB चा कसा असेल प्लेऑफचा मार्ग?

स्वत:ला कधीच अतिशहाणे समजू नये

आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीने स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ किंवा अतिशहाणे समजू नये, हे अहंकारीपणाचे लक्षण आहे. लोकांनी हे असे करणे टाळावे. कारण माणसाला अहंकाराने घेरले की त्याची प्रतिभा नष्ट होऊ लागते. अशा व्यक्तींना पुढे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. लक्ष्मीजीही अशा लोकांना सोडून निघून जातात. कारण अहंकार आणि अहंकारी व्यक्ती माता लक्ष्मीला अजिबात आवडत नाहीत.

कठोर शब्द वापरू नका

आचार्य चाणक्य यांच्या मते, नेहमी अशी वाणी बोलली पाहिजे, जी ऐकणाऱ्याच्या कानाला गोड वाटेल. याचा सरळ अर्थ असा की, माणसाने नेहमी मधुर आवाजात बोलावे. कठोर शब्द बोलू नका. गोड वाणीने बोलणारे जीवनात अधिक प्रगती करतात. अशी माणसे सर्वांना प्रिय असतात. त्याचा सर्वत्र आदर केला जातो. तसेच जो माणूस कठोर आणि कडू शब्द बोलतो, त्याची लोकप्रियता कमी होते. लोक त्यांच्यापासून दूर राहतात. जे प्रगती आणि यशाच्या आड येते. अडचणी आणि अडथळे वाढतात. अशा लोकांवर लक्ष्मीजीही रागावतात.

आळस करू नये

आचार्य चाणक्य म्हणतात की, लक्ष्मी नेहमी आळशी व्यक्तीपासून दूर राहते. जर एखाद्या व्यक्तीला यश मिळवायचे असेल आणि त्याला सुख आणि संपत्ती देखील हवी असेल तर त्यांनी आळस सोडून द्यावा. कारण आळस आयुष्य उध्वस्त करतो. लक्षणीय बाब म्हणजे आळशीपणा अंगीकारणाऱ्या व्यक्तीपासून लक्ष्मी दूर जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी