या ५ ठिकाणी एन्जॉय करा न्यू ईअर, पाहा काय आहे तिथे खास! 

लाइफफंडा
रोहित गोळे
Updated Dec 21, 2019 | 20:26 IST

New Year 2020: नव्याच्या स्वागतासाठी आता प्रत्येकजण सज्ज झाला आहे. हा दिवस खास बनविण्यासाठी आपण जर काही प्लॅनिंग करत असाल तर आम्ही आपल्यासाठी एक गोष्ट घेऊन आलो आहोत. 

these 5 city best place for enjoying new year celebration mumbai goa pondicherry manali delhi
या ५ ठिकाणी एन्जॉय करा न्यू ईअर, पाहा काय आहे तिथे खास!   |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: जर आपण विचार करात असाल की, नव्या वर्षाचं स्वागत कसं करायचं आणि कुठे जायचं? तर आता आपल्याला फार विचार करण्याची गरज नाही. कारण की, भारतात अशा अनेक जागा आहेत जिथे विशेषत: न्यू ईअरसाठी स्पेशल पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी आपण आपल्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत मजा-मस्ती करु शकतात. 

चला तर मग जाणून कोणती आहे अशी ठिकाणी जिथे तुम्हाला सेलिब्रेट करता येईल तुमचं न्यू ईअर सेलिब्रेशन: 

  1. मुंबई: असं नेहमी म्हटलं जातं की, हे शहर कधीही झोपत नाही. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हे सर्वात चांगल्या ठिकाणांपैकी एक आहे. नव्या वर्षाच्या स्वागतात संपूर्ण मुंबई शहर हे झगमगाट आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने नाहून निघतं. इथं आपण आपल्या मित्रांसोबत किंवा एखाद्या खास व्यक्तीसोबत बसून ड्रिंकचा आस्वाद घेऊ शकता. संपूर्ण मुंबईत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक विविध कार्यक्रम आयोजित केलेले असतात. त्यातही आपण सहभागी होऊ शकतात. मुंबईत आपण गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी जाऊ शकतात. जिथे अक्षरश: जत्राच भरलेली असते. याशिवाय अनेक खास ठिकाणं आहेत जिथे आपण न्यू ईअरचं सेलिब्रेशन करु शकता.
  2.  
  3. गोवा: स्वस्त बीअर, सुंदर समुद्र किनारे, लाईव्ह संगीत आणि संपूर्ण रात्र चालणाऱ्या पार्ट्या या गोष्टी तरुणाईला गोव्याकडे खेचून आणतात. गोव्यातील न्यू ईअर पार्ट्या या इतर पार्ट्यांपेक्षा नक्कीच वेगळ्या असतात. इथे प्रत्येक व्यक्ती हा थिरकण्यास भाग पडतो. येथील सँडी बीचवर संपूर्ण रात्र लोकं नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करतात. इथे आपण सी फूडचा देखील आनंद घेऊ शकतात. इथे इंटिमेट पार्टीसाठी अंजुना बीच, ग्रीक स्टाईल पार्टीसाठी कामाकी बार, पूलसाइड पार्टीसाठी हॉटेल ग्रँड हयात खूपच प्रसिद्ध आहे. यासाठी नवं वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी गोवा ही एक उत्तम जागा आहे. 
  4. पद्दुचेरी  (पाँडिचेरी): नव्या वर्षाच्या पूर्व संध्येला समुद्र किनारी होणाऱ्या पार्ट्या या पाँडिचेरीच्या मुख्य आकर्षण आहेत. सेलिब्रेशनसाठी ही समुद्र किनारी अत्यंत नयनरम्य अशा फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे येथील रस्ते हे रंगीबेरंगी रंगानी न्हाऊन निघाल्याचा भास होतो. पाँडिचेरीमधील ऑरो बीच न्यू ईअरसाठी खूपच प्रसिद्ध आहे. इथे आपण नाईट पार्टीशिवाय शॉपिंग आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. 
  5. मनाली: बर्फाळ शहर अशी ओळख असलेल्या मनालीमध्ये नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणं हे एखाद्या साहसी खेळाप्रमाणेच आहे. इथे आपण आपल्या कुटुंबीयांसोबत किंवा मित्रांसोबत न्यू ईअर सेलिब्रेट करु शकता. येथील हॉटेलांमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी खास पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. याशिवाय आपण सोलंग व्हॅली आणि कुफरीमध्ये रोड ट्रिप करु शकता. इथे ट्रेकिंगसोबत स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वादही घेऊ शकतात. जर आपण मनालीला आलात तर येथील विलोभनीय अशी खरीखुरी निसर्गचित्र आणि निसर्गाच्या सान्निध्यात नव्या वर्षाच्या चांगल्या आठवणी घेऊन घरी परतू शकता. 
  6. दिल्ली: नवं वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी दिल्ली ही उत्तर भारतातील सगळ्यात चांगली जागा आहे. ड्रिंक, गाणी, लाइट्स आणि डान्स यासह एन्जॉय करण्यासाठी अनेक गोष्टी इथे उपलब्ध आहेत. नव्या वर्षाच्या पूर्व संध्येला इथे लोकं नाइट क्लबमध्ये मित्रांसह एन्जॉय करायला जातात. येथील नाइट क्लब्समध्ये देशातील प्रसिद्ध डीजे देखील बोलावले जातात. जिथे लोक त्यांच्या गाण्यांवर बेभान होऊन थिरकतात आणि नव्या वर्षाचं स्वागत करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी