Women's Perfumes: हे ५ परफ्यूम महिलांसाठी आहेत खूप खास; उन्हाळ्यातही ठेवतात ताजेतवाने

लाइफफंडा
Updated May 06, 2022 | 11:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Women's Perfumes । गरमीमध्ये शरीरातील घामामुळे खूप दुर्घंधी बाहेर येत असते. यापासून बचाव करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या परफ्यूमचा वापर करत असतात. महिला आणि पुरूषांसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम उपलब्ध आहेत.

These 5 perfumes are very special for women, Keeps fresh even in summer
हे ५ परफ्यूम महिलांसाठी आहेत खूप खास  |  फोटो सौजन्य: AP, File Image
थोडं पण कामाचं
  • गरमीमध्ये शरीरातील घामामुळे खूप दुर्घंधी बाहेर येत असते.
  • महिला आणि पुरूषांसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम उपलब्ध आहेत.
  • स्किन हा परफ्यूम हल्ली खूप चर्चेत आहे.

Women's Perfumes । मुंबई : गरमीमध्ये शरीरातील घामामुळे खूप दुर्घंधी बाहेर येत असते. यापासून बचाव करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या परफ्यूमचा वापर करत असतात. महिला आणि पुरूषांसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम उपलब्ध आहेत. मात्र आपण कोणत्या प्रकारचा परफ्यूम खरेदी करावा आणि आपल्यासाठी कोणता परफ्यूम योग्य आहे याबाबत महिलांच्या मनामध्ये नेहमीच संभ्रम असतो. चला तर म जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त असणारे काही खास परफ्यूम. (These 5 perfumes are very special for women, Keeps fresh even in summer). 

अधिक वाचा : बनावट नोटा छापणाऱ्या टोळीस अटक

झारा रेड व्हॅनिला - हा पूर्णपणे व्हॅनिला फ्लेवरचा परफ्यूम आहे. यामुळे तुम्हाला ताजेतवाने असल्याचा आभास मिळेल. या परफ्यूममध्ये काळ्या मनुका, आयरिश व्हॅनिलाचा सुगंध येतो. लक्षणीय बाब म्हणजे हा परफ्यूम दीर्घकाळ चालणारा आहे. या परफ्यूमचा वास फळांचा आणि बडीशेपसारखा आहे. तसेच या परफ्यूमची बॉटल खूपच क्लासी आहे.

मिनिसो लॉलीपॉप पिंक - हा परफ्यूम फळे आणि फ्लॉवर यांच्या संतुलित सुगंधाचे उत्तम उदाहरण आहे. हा एक फ्लॉवर आधारित परफ्यूम आहे. या परफ्यूमची बॉटल खूप क्लासी आणि दिसायला अतिशय आकर्षित आहे. हा परफ्यूम रात्री आणि दिवसा दोन्हीही वेळा प्रभावी काम करतो. महिलांसाठी हा परफ्यूम एक चांगला पर्याय आहे. 

फॉग परफ्यूम आय ॲम क्विन - तुम्ही एखाद्या मोठ्या कार्यक्रमात अथवा प्रसंगात या परफ्यूमचा वापर करू शकता. याचा सुगंध आकर्षित करणारा आहे. यामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या मिश्र सुगंधांचा अनुभव घेता येणार आहे. यामध्ये संत्री, गुलाब, चमेली, आले, चंदन इत्यादींचा समावेश आहे.

द बॉडी शॉप स्ट्रॉबेरी - गरमीच्या दिवसात महिलांसाठी हा परफ्यूम एक प्रभावी पर्याय आहे. या परफ्यूमचा वास फ्रूटी आहे. यामध्ये तुम्हाला ऊस आणि स्ट्रॉबेरीचा सुगंध अनुभवता येईल. हा परफ्यूम तुम्ही गरमीच्या दिवसातही वापरू शकता. 

स्किन -  स्किन हा परफ्यूम हल्ली खूप चर्चेत आहे. महिला या परफ्यूमला खूप पसंत करतात. त्याचा सुगंध फुलांचा आणि फेमिन आहे. एखाद्या पार्टीसाठी किंवा डेटला जाण्यासाठी आपण स्वत: साठी अशा प्रकारचे परफ्यूम निवडू शकता. त्याची बॉटल एकदम फॅन्सी दिसते. हा परफ्यूम लावल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी