Secrets of Girls : मुलींची ही 5 सिक्रेट्स, जी प्रत्येक मुलांना माहितीच असावी.

लाइफफंडा
Updated Mar 24, 2022 | 15:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Secrets of Girls : कोणत्याही नात्यात समोरच्या व्यक्तीबद्दल जाणून घेणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला आपण नीट समजून घेतो. मुलींना कशी मुली आवडतात हे त्या कधीच कोणाला सांगत नाहीत आणि हे गुपित मनात ठेवतात. जर मुलांना हे रहस्य माहित असेल तर ते कोणत्याही मुलीशी चांगले बॉन्डिंग करू शकतात.

These 5 secrets of girls, which every boy should know.
मुलींची ही सिक्रेट्स कायम लक्षात ठेवा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुली त्यांचे रहस्य स्वतःकडेच ठेवतात
  • काही गोष्टी त्या कोणाशीही शेअर करत नाही
  • मुलींचं मन समजून घेतल्यास त्यांना समजणंही खूप सोप असतं.

Secrets of Girls : जर तुम्हाला कोणाशी मैत्री करायची असेल तर आधी समोरच्या व्यक्तीला ओळखणे खूप गरजेचे आहे. लोकं अनेक गोष्टी त्यांच्या मनात साठवून ठेवतात. 
ज्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेणे आणि त्यांना समजून घेणे खूप कठीण आहे. मुलींबद्दल बोलायचे झाले तर मुलींचं मनं जाणून घेणे कठीण आहे, कारण मुली फार कमी व्यक्तींसमोर आपलं मन मोकळं करतात. एखादी मुलगी तिच्या आवडी-निवडी फार कमी लोकांसोबत शेअर करते पण जर तुम्हाला तिच्याशी मैत्री करायची असेल किंवा त्यांच्यासाठी खास बनायचे असेल तर आधी त्यांचे मन जाणून घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला मुलींची अशी काही रहस्ये जाणून घ्यावी लागतील, जी ती फक्त स्वत:पुरतीच मर्यादित ठेवते. 

जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या तर त्या तुमच्यासाठी सोयीस्कर असतील आणि तुम्ही दोघेही मैत्री किंवा इतर कोणतेही नाते चांगल्या प्रकारे निभावू शकता. 

1 - मुलींना अशी मुले आवडतात

WebMD च्या मते, मुलींना अशी मुलं आवडतात जी नजरेला नजर देऊन आत्मविश्वासाने बोलतात. याचे कारण असे की जी मुले डोळ्यात बघून बोलतात ते अधिक आत्मविश्वासी दिसतात आणि मुलींना अशी मुले खूप आवडतात. तर दुसरीकडे, एखादा मुलगा इकडे-तिकडे बघत बोलत असेल किंवा नजर खाली ठेवून बोलत असेल, तर मुलींना ती मुले आवडत नाहीत. 

2. जजमेंटल मुले मुलींना आवडत नाहीत

मुलींना जजमेंटल मुले अजिबात आवडत नाहीत याची मुलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. मुलींनी हे करू नये, मुलींनी ते करू नये अशाप्रकारे मुलींना जज करणं सोडून द्या. ते मुलींना अजितबात आवडत नाही. त्यामुळे हा विचार सध्याच्या काळात तुम्ही करत असाल तर कोणतीही मुलगी तुम्हाला पसंत करणार नाही. 

3. मुलींना सरप्राईजेस आवडतात

मुलींना सरप्राईज खूप आवडतात. मुली खुल्या मनाने हे कधीच उघड करणार नाही, परंतु प्रत्येक मुलीला सरप्राईज आवडतात. आता ती तुमची मैत्रीण असो, बहीण असो की पत्नी, ती कोणीही असो. म्हणूनच कोणत्याही नात्यात, मुलांना मुलींना सरप्राईज करणे आवडते. जर तुम्हाला एखाद्या मुलीसोबत चांगले नाते हवे असेल तर तुम्ही वेळोवेळी छोटे छोटे सरप्राइज देऊ शकता. 

अधिक वाचा : उमर खालिदचा मुक्काम जेलमध्येच, जामीन अर्ज फेटाळला

4. मजा-मस्करी करणारी मुलं मुलींना आवडतात

मुलींना सहसा अशा लोकांशी मैत्री किंवा नातेसंबंध ठेवायला आवडतात, जो आनंदी मुलगा असतो. जर एखादा मुलगा नेहमी दु:खी असेल किंवा एकसारखं आपलं दु:खाचं गाऱ्हाणं ऐकवत असेल तर मुलींना अशी मुलं आवडत नाहीत. जर तुम्ही तुमच्या समस्या नेहमी मुलींसमोर मांडत असाल तर तुम्हाला तुमचा स्वभाव बदलण्याची गरज आहे. आनंदी असणारी, मजा-मस्करी करणारी मुलं मुलींना आवडतात, कारण कोणतीही अडचण लोकांना सांगण्यापेक्षा त्यावर उपाय शोधा. 

अधिक वाचा : शारिरीक संबंधासाठी लागेल बायकोची Permission, जर कराल तर...

5. मुलींचा आदर करणारी मुले मुलींना आवडतात

मुलींना अनेकदा आदराने बोलणारी मुले आवडतात. मुली ही गोष्ट कधीच सांगणार नाहीत, पण लक्षात ठेवा की मुली सगळ्यात आधी कोणत्याही मुलामध्ये मुलींचा आदर करण्याचा गुण आहे हे पाहतात. त्यामुळे प्रत्येक मुलीशी किंवा स्त्रीशी नेहमी आदराने बोला, फक्त त्यांचे मन जिंकण्यासाठी नाही तर प्रत्येक स्त्रीशी आदराने बोलणे ही तुमची जबाबदारी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी