'हे' आहेत अभिनेत्री मौनी रॉयचे ५ ब्यूटी सीक्रेट्स

अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. जी आपली त्वचा चमकदार आणि तजेलदार ठेवायची असल्यास आपण देखील काही टिप्स नक्की वापरु शकता.

Mouni_Roy
'हे' आहेत अभिनेत्री मौनी रॉयचे ५ ब्यूटी सीक्रेट्स  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी मौनी रॉय भरपूर पाणी पितो
  • मौनी रॉय झोपेच्या आधी मेकअप काढते. 
  • मौनी रॉय निरोगी राहण्यासाठी सनस्क्रीन लावण्याची शिफारस करते. 

मुंबई: मौनी रॉय ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. आपली त्वचा तजेलदार आणि चमकदार  ठेवण्यासाठी ती नेहमीच घरगुती उपचार करत असते. त्यामुळे जर आपल्याला आपली त्वचा चमकदार आणि तजेलदार ठेवायची असल्यास आपण देखील या गोष्टी करणं गरजेचं आहे.

मौनी रॉय ही बॉलिवूडबरोबरच टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करणार्‍या बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी  एक आहे. तिला इंडस्ट्रीमध्ये बंगाली ब्युटी म्हणूनही ओळखले जाते आणि आपल्या फॅशन सेन्समुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहते. या सौंदर्य आणि फॅशन सेन्समुळे तिचे फॅन्स फॉलोवर देखीलं मोठं आहे. जाणून घ्या तिच्या सौंदर्याचे रहस्य:

  1. मौनी रॉय चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी नेहमी स्वत:ला हायड्रेटेड ठेवते आणि दिवसभर भरपूर पाणी पिते.
  2. मौनी रॉय तिच्या चमकत्या त्वचेसाठी दालचिनीसह गरम पाण्याचे सेवन देखील करते. यामुळेच तिची त्वचा बर्‍यापैकी स्वच्छ राहते.
  3. बाहेर पडण्यापूर्वी मौनी रॉय सनस्क्रीन वापरते जेणेकरून स्क्रीनवर कुठेही टॅनिंग होत नाही.
  4. मौनी रॉयला मेकअप खूप आवडतो. जे आपल्याला तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर पाहायला देखील मिळतं. पण झोपायच्या आधी ती नेहमीच आपला मेकअप काढून झोपते. कारण तिच्या मते, मेकअपने तुमची त्वचा कोरडी होते. त्यामुळे रात्री झोपण्याआधी मेकअप काढून टाकावा. तसंच नेहमी नाईट क्रीमच वापर करावा.
  5. मौनी दररोज केळीचे सेवन करते. कारण केळी आपली त्वचा मऊ ठेवते, यामुळे तिची त्वचा कायम तजेलदार राहते.

तर चमकत्या त्वचेसाठी आपण देखील मौनी रॉयप्रमाणेच या टिप्स वापरु शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी