Unique Railway Stations । नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) आशियातील दुसरे सर्वात मोठे आणि जगातील चौथे मोठे रेल्वे स्थानक आहे. भारतात ८००० हून अधिक रेल्वे स्टेशन्स आहेत, जिथे लाखो लोक दररोज प्रवास करतात. दरम्यान रेल्वेचे तिकीट स्थानकांच्या नावांच्या आधारे बुक केले जाते. मात्र खूपच कमी लोकांना माहिती आहे की आपल्या देशात दोन स्टेशन्स अशी आहेत ज्यांना नावे नाहीत. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरे आहे. (These are the most unique railway stations in the country without a name).
अधिक वाचा : राहुल त्रिपाटीला संधी न मिळाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी
यातील पहिले रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमधील वर्धमानपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थानक रैना आणि रायनागढ या दोन गावांमध्ये बांधले आहे. असे म्हणतात की पूर्वी या स्थानकाचे नाव रायनगर असे होते.
अधिक वाचा : माता लक्ष्मी घरी येण्याआधी देते हे संकेत, वाचा सविस्तर
स्टेशनचे रायनगर हे नाव रैना गावातील लोकांना आवडले नाही. यानंतर स्थानकाच्या नावावरून दोन्ही गावांमध्ये वाद सुरू झाला. या स्थानकाची इमारत रैना गावाच्या जमिनीवर बांधण्यात आली असल्याने त्याचे नाव रैना ठेवावे, असे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर रेल्वे बोर्डाने स्थानकाचे नाव हटवले. तेव्हापासून अद्याप या स्थानकाला कोणतेही नाव नाही.
हे स्टेशन सन २००८ मध्ये केले होते. तेव्हापासून ते वादात सापडले आहे. ग्रामस्थांच्या भांडणामुळे स्थानकावरील साईन बोर्डवरून स्थानकाचे नाव हटविण्यात आले. स्थानकाचे नाव नसल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
असेच एक रेल्वे स्टेशन झारखंडमध्ये देखील आहे, ज्याचे नाव नाही. मिळालेल्या माहितीनुसार हे अनोखे स्टेशन रांचीहून तोरीला जाणाऱ्या रेल्वे मार्गावर आहे. २०११ मध्ये या स्थानकावर प्रथमच ट्रेन धावली होती. त्यानंतर त्याला बदकीचंपी असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र शेजारील कमळे गावातील लोकांनी त्यास विरोध केला. तेव्हापासून या स्थानकाचे नाव ठेवण्यात आलेले नाही.