Top 10 Whisky in Marathi: या आहेत जगातल्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या 10 Whisky ब्रॅंडस 

लाइफफंडा
Updated Mar 17, 2023 | 10:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Top 10 Whisky in Marathi:जगात तळीरामांची कमी नाही, श्रीमंत असो वा गरीब असो, प्रत्येक वर्गातील मद्यप्रेमी या पैयांमध्ये  मश्गुल झालेले आहेत. मात्र, तुम्हाला हे ठाऊक आहे का, कि जगात सर्वात जास्त खप होत असलेले Whisky ब्रॅंडस कोणते?

wiskey
श्रीमंत असो वा गरीब असो, प्रत्येक वर्गातील मद्यप्रेमी या पैयांमध्ये मश्गुल झालेले आहेत.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मॅक्डॉवेल्स  जगात सर्वात जास्त विकली जाणारी Whisky ब्रॅंड आहे.
  • ऑफसर्स चॉइस जगातली दुसऱ्या क्रमांकावरील Whisky आहे
  • सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या Whisky मध्ये भारताची रॉयल स्टैग ही चौथ्या क्रमांकावर येते.

Top 10 Whisky in Marathi: जगात तळीरामांची कमी नाही, श्रीमंत असो वा गरीब असो, प्रत्येक वर्गातील मद्यप्रेमी या पैयांमध्ये मश्गुल झालेले आहेत. मात्र, तुम्हाला हे ठाऊक आहे का, की जगात सर्वात जास्त खप होत असलेले Whisky ब्रॅंडस कोणते? (These are world's top ten Whisky Brands )

1. मॅक्डॉवेल्स | McDowell’s
 मॅक्डॉवेल्स  जगात सर्वात जास्त विकली जाणारी Whisky ब्रॅंड आहे. फोर्ब्स च्या एका अहवालानुसार याची वार्षिक विक्री  27.63 कोटी लीटर इतकी आहे. 

2. ऑफसर्स चॉइस | Officer's Choice
ऑफसर्स चॉइस जगातली दुसऱ्या क्रमांकावरील Whisky आहे, जिचा खप सर्वाधिक होतो. ही Allied Bladers & Distilleries Company द्वारे उत्पादित केली जाते. त्याची वार्षिक विक्री 27.54 कोटी लीटर इतकी आहे. 

3. इंपीरियल ब्लू | Imperial Blue
अव्वल तिसऱ्या  तिसऱ्या क्रमांकावर  इंपीरियस ब्लू या भारतीय ब्रॅंड च्या Wisky चा समावेश होतो.  ही  'परनॉड रिकार्ड' कंपनी द्वारे बनवली जाते.  हिची वार्षिक खप  23.97 कोटी लीटर इतका आहे.

अधिक वाचा  : Beed Accident: बीडमध्ये ऊसतोड कामगारांच्या ट्रकला भीषण अपघात, 20 ते 25 कामगार जखमी

 4. रॉयल स्टैग | Royal Stag
जगात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या Whisky मध्ये भारताची रॉयल स्टैग ही चौथ्या क्रमांकावर येते. हिची वार्षिक १९.८० कोटी लीटरच्या आसपास विक्री आहे. 

5. जॉनी वॉकर | Johnnie Walker
या यादीत पाचव्या स्थानावर सुप्रसिद्ध जॉनी वॉकरची वर्णी लागते. ही Whisky स्कॉटलँड ची डियेजियो कंपनी उत्पादित करते. 

6. जॅक डेनियल्स | Jack Daniel's
  या यादीत पाचव्या क्रमांकावर अमेरिकेत सर्वात जास्त पसंत केली जाणारा ब्रॅंड जॅक डेनियल्स चा समावेश होतो. ब्राऊन फोरमेन कंपनी ही Whisky बनवते. 

अधिक वाचा  : Mumbai Double Decker road: घाटकोपरपासून ठाण्यापर्यंत डबल डेकर रोड, मुंबई अन् ठाणेकरांचा प्रवास होणार सुसाट

7. ओरिजिनल चॉइस | Original Choice
सातव्या क्रमांकावर ओरिजिनल चॉइस चे नाव येते.  ही Whisky भारतीय कंपनी 'जॉन डिस्टलरीज़’ बनवते. याची वर्षामध्ये  12.700  केसची विक्री झाली आहे. 

8. जिम बीम | Jim Beem
आठव्या क्रमांकावर आणखीन एका अमेरिकेच्या ब्रॅंड चा समावेश आहे.  तो ब्रॅंड म्हणजे जीम बीम. ही ‘सनटोरी कंपनी’ द्वारे उत्पादित केली जाते.  ही Whisky देखील जगात मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते.

अधिक वाचा  : Genelia Deshmukh : जेनेलिया घेऊन गेली चाहत्यांना तिच्या कॉलेज दिवसांत

9. हेवर्ड्स फ़ाइन | Hayward Fine
या यादीत नवव्या क्रमांकावर लिकर किंग विजय मल्ल्या यांच्या युनायटेड स्पिरीट च्या  हेवर्ड्स फ़ाइन चे नाव आहे. याची जवळपास 9. 600 लीटर इतकी वार्षिक विक्री आहे. 

10. ८ पीएम | 8 PM
दहाव्या क्रमांकावर देखील भारतीय ब्रॅंड चा दबदबा आहे. 8 पी एम ही भारतीय ब्रॅड ची Whisky भारतात मध्यमवर्गीय लोकांमध्ये सर्वात जास्त पसंत केली जाते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी