Only for adults: या हॉटेलमध्ये मिळतो फक्त प्रौढांना प्रवेश, अशी आहे आयडिया

लहान मुलांसोबत राहणं, त्यांचे प्रश्न, त्यांची बडबड या सर्व बाबी अत्यंत रम्य असतात. मात्र अनेकदा यापासूनही थोडा ब्रेक घेण्याची गरज असते. त्यासाठीच जगातील काही देशांमध्ये केवळ प्रौढांसाठी हॉटेलची संकल्पना उदयाला आली.

Only for adults
या हॉटेलमध्ये मिळतो फक्त प्रौढांना प्रवेश  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या हॉटेल्समध्ये फक्त प्रौढांना प्रवेश
  • लहान मुलं असतील तर इथे येऊ नका
  • कपलसाठी आदर्श ठिकाणं

Only for adults: नेहमीचं काम आणि नेहमीचं रूटिन यात दिवसांमागून दिवस जात असतात आणि कधीतरी आपण शांतपणे या सगळ्यापासून दूर जावं आणि काही दिवस सुट्टी घ्यावी, असं अनेकांना वाटत असतं. अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर जातात. मात्र बाहेर गेल्यावर ऑफिसचं काम बंद झालं तरी आपले कुटुंबीय आणि लहान मुलं (kids) सोबत असल्यामुळे अनेकांना पूर्ण मानसिक आराम मिळत नाही. लहान मुलांसोबत राहणं, त्यांचे प्रश्न, त्यांची बडबड या सर्व बाबी अत्यंत रम्य असतात. मात्र अनेकदा यापासूनही थोडा ब्रेक घेण्याची गरज असते. त्यासाठीच जगातील काही देशांमध्ये केवळ प्रौढांसाठी हॉटेलची संकल्पना उदयाला आली. प्रौढांना तिथं शांतपणे सुट्टी एँजॉय करता यावी, इतर कुणीही त्यांना डिस्टर्ब करू नये आणि शारीरिक शांततेसोबत मानसिक शांतताही लाभावी, या उद्देशाने सुरु करण्यात आलेली ही संकल्पना आता भारतातही मूळ धरू लागली आहे. इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारतात अशा हॉटेलची (Only for adults) संख्या कमी असली तरी हळूहळू या संकल्पनेचा मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. जाणून घेऊया या संकल्पनेवर आधारित देशातील काही प्रसिद्ध हॉटेल्स. 

१. द पार्क बाग रिव्हर, गोवा

या हॉटेलमध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. गोवा सफारीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या कपल्ससाठी हे हॉटेल आदर्श ठिकाण मानलं जातं. बागा नदीच्या किनारी हे हॉटेल उभं असून तिथून आजूबाजूच्या हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेता येतो. उत्तर गोव्यातील बहुतांश पर्यटन स्थळांपासून हे हॉटेल जवळ आहे. तुम्ही एक स्कूटर भाड्याने घेऊन आजूबाजूची अनेक रोमँटिक ठिकाणं पाहू शकता. 

२. आनंद हॉटेल, ऋषिकेश, हिमालय

या हॉटेलमध्ये 14 वर्षांखालील मुलांना प्रवेश देण्यात येत नाही. या ठिकाणी निसर्गाचा आणि शांततेचा आनंद घेण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे मसाज, आयुर्वेदिक उपचार आणि मेडिटेशन यासाठी ही जागा प्रसिद्ध असून कुठल्याही डिस्टर्बन्सशिवाय इथला आनंद घेता येऊ शकतो. 

३. द टमारा कुर्ग, कर्नाटक

पश्चिम घाटांतील हिरव्यागार डोंगरदऱ्यांमध्ये बांधण्यात आलेलं हे रिसॉर्ट आहे. या ठिकाणी 12 वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे तुमची मुलं बारा वर्षांपेक्षा लहान असतील, तर या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. या ठिकाणी राहून जंगल सफारीचा मनमुराद आनंद घेता येऊ शकतो. 

४. वात्स्यायना, उत्तराखंड

अलमोरामध्ये उभारण्यात आलेलं हे रिसॉर्ट केवळ प्रौढांना प्रवेश देतं. इथल्या आरामदायी सोयीसुविधा, शांतता आणि आजूबाजूचा निसर्ग यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणाचा पसंती देतात. कपल्ससाठी हे ठिकाण उत्तम आणि सुरक्षित समजलं जातं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी