Clove-Camphor Astro Tips: कापूर - लवंगाचे हे उपायानं उजळेल नशीब, भरेल तिजोरी; होतील प्रचंड फायदे

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Nov 08, 2022 | 13:18 IST

Vastu Tips: लवंगासह कापूर जाळणे देखील खूप शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख-शांती येते, नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय.

Vastu Tips
कापूर-लवंगाचे हे उपायानं उजळेल नशीब, भरेल तिजोरी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जीवनात शांती कोणाला नको असते? काही नोकरीमुळे (Unhappy) काही पैशाअभावी नाराज असतात.
  • किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत.
  • लवंग संदर्भात ज्योतिष शास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

मुंबई:  Astro Remedies: जीवनात शांती कोणाला नको असते? काही नोकरीमुळे (Unhappy) काही पैशाअभावी नाराज असतात. तुमच्या परिश्रमात कोणतीही कमतरता असू शकत नाही मात्र काहीतरी वेगळेच अडथळा निर्माण होत असतील तर त्याचे निराकरण करून तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्हाला आरोग्य तर मिळतेच पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही त्यांचे विशेष महत्त्व आहे. लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे. पूजेपासून मसाला म्हणूनही त्याचा वापर केला जातो.

लवंग संदर्भात ज्योतिष शास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे ऑफिस किंवा इतर समस्या दूर करू शकता. ते घरात सुख-समृद्धीही आणतात. लवंगासह कापूर जाळणे देखील खूप शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख-शांती येते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय.

अधिक वाचा-  भारत जोडो यात्रा रात्री राज्यात, असा असेल राहुल गांधी यांचा आजच्या यात्रेचा कार्यक्रम 

विरोधकांना अशा प्रकारे मात द्या

जर शत्रूंनी तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग बाण म्हणा. यानंतर 5 लवंगा कापूरने जाळून हनुमानजींची पूजा करा. उरलेल्या राखेने कपाळावर तिलक लावावा. असे केल्याने शत्रू आपोआपच बाजूला होईल असा विश्वास आहे.

आर्थिक लाभ होईल

रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी घ्या. त्यात कापूर आणि लवंग एकत्र जाळून टाका. असे मानले जाते की, यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू लागतो. दुसरा उपाय म्हणजे लाल कपड्यात पाच लवंगा आणि पाच कौड्या बांधा. धनाची देवी लक्ष्मीच्या पायावर ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते.

घरात सुख-शांती नांदेल

रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा. यामुळे घरगुती कलह दूर होऊ शकतो. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते. आजारपण घरचा रस्ता विसरतात. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो.

नकारात्मक ऊर्जा दूर करा

एक वाडगा घ्या. त्यात 5 लवंगा, हिरवी वेलची आणि कापूर जाळून पूजास्थानासह घरभर दाखवा. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते. यासोबतच हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यताही कमी होते. हे काम आठवड्यातून किमान दोनदा करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी