Relationship Tips : सुखी वैवाहिक जीवनासाठी नवरोबानं कराव्यात या गोष्टी,आयुष्य राहील आनंदाचं

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Oct 29, 2022 | 15:23 IST

वैवाहिक जीवनात समाधान मिळवण्यासाठी उत्तम लैगिंक जीवन असणं फार महत्वाचं असतं. मात्र स्त्रिया मोकळेपणानं अगदी जोडीदाराशीही बोलत नाही. अपेक्षा त्यांच्याही असतात, पण त्या सांगत नाही. जोडीदारानं समजून घ्यावं, अशी अपेक्षा असते.

These things should be done by the bride and groom for a happy married life, the life will be happy
सुखी वैवाहिक जीवनासाठी नवरोबानं कराव्यात या गोष्टी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सेक्स केल्यानंतर उठण्याची घाई करू नका. महिलांना अनेकदा सेक्स केल्यानंतर जोडीदाराला बिलगून झोपावेसे वाटते.
  • सेक्सचा आनंद घेण्यासाठी बऱ्याच महिलांना फोरप्लेची गरज असते.
  • महिलांचं लैंगिक सुख, त्या सुखाच्या कल्पना आणि अपेक्षा या पुरुषांहून वेगळ्या असतात.

नवी दिल्ली :  वैवाहिक जीवनात (married life) पती-पत्नीने एकमेंकांना समजून घेतलं पाहिजे. लैंगिक संबंधाविषयी एकमेकांच्या काय अपेक्षा असतात, हे समजून घेणं गरजेचं आहे. पण बहुतेक नवरोबानं आपल्या पत्नीच्या (wife) लैंगिक संबंधाविषयी काय अपेक्षा आहेत हे जाणून घेत नाहीत. तर महिला बोलत नाही आणि लैंगिक सुखासह वैवाहिक आनंदापासूनही कायम दूरच राहतात. ते कसे टाळता येईल. वैवाहिक जीवनात समाधान मिळवण्यासाठी उत्तम लैगिंक जीवन असणं फार महत्वाचं असतं. मात्र स्त्रिया मोकळेपणानं अगदी जोडीदाराशीही बोलत नाही. अपेक्षा त्यांच्याही असतात, पण त्या सांगत नाही. जोडीदारानं समजून घ्यावं, अशी अपेक्षा असते. (These things should be done by the bride and groom for a happy married life, the life will be happy)

अधिक वाचा  : ड्रग्स प्रकरणात भारती अन् हर्षच्या अडचणी वाढणार
जे अनेकदा शक्य नसतं किंवा घडत नाही. मग उगीच धुसफूस, भांडणं, सेक्समधला रसच संपणं आणि अन्य शारीरिक-मानसिक तक्रारी सुरू होतात. हे सारं टाळायचं तर पुरुषांनी, पतीनंही आपल्या पत्नीच्या-जोडीदाराच्या लैंगिक अपेक्षा, त्यांच्या सेक्सविषयीच्या कल्पना, फॅण्टसी समजून घ्यायला हव्यात. जर्नल ऑफ सेक्स ॲण्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रसिध्द झालेल्या अभ्यासानुसार महिलांचं लैंगिक सुख, त्या सुखाच्या कल्पना आणि अपेक्षा या पुरुषांहून वेगळ्या असतात. याचमुळे असं होतं की, आपल्याला ज्या गोष्टी हव्या त्याच गोष्टी पत्नीला आवडतील असं ठरवून पुरुष लैंगिक गोष्टींमध्ये पुढची स्टेप घेत असतात. पण पत्नीला ते आवडत नाही, यामुळे भांडणं होत असतात. पत्नीशी या विषयावर बोलणं सुरू करा.

महिलांना नेमकं काय हवं असतं? 

 तुला काय आवडतं? कशानं सुख वाटतं?

लैंगिक संबंध म्हणजे केवळ विशिष्ट कृती नव्हे. लैंगिक सुखाविषयी बोलणं, रोमांस त्यामुळे लैंगिक जीवन आणखी चांगले होऊ शकते. त्यामुळेच  सेक्स दरम्यान तुमच्या जोडीदाराची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या आवडत्या पोझिशनबद्दलही विचारा. कल्पनारम्य गोष्टींबद्दल बोला. सेक्स करताना तिला काय चांगले वाटते, काय हवे आहे हे विचारा.

अधिक वाचा  : भारताच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यात होणार मोठा बदल

स्पर्श समजून घ्या

तुमच्या जोडीदाराचे शरीर जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला कुठे स्पर्श करायला आवडते ते शोधा. स्त्रियांच्या स्तनाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळते, असे पुरुषांना अनेकदा वाटत असते, पण तसे अजिबात नाही. स्त्रियांच्या मनात काही वेगळे असू शकते. काहींना मानेवर तर काहींना पायावर चुंबन घेणे आवडते. 

डर्टी टॉक थेट सुरू करू नका 

हा खरंतर अत्यंत व्यक्तिगत प्रश्न आहे. कुणाला रोमॅण्टिक चावट बोललेलं आवडतं. त्यानं उत्तेजीतही होतात काहीजणी. काहींना अजिबात नाही आवडत, अश्लिल वाटतं. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला जे आवडत नाही ते बोलू नका.

 वेगवेगळ्या पोझिशन्स

पोर्न साइट्स किंवा अन्य माहिती यातून सेक्स पोझिशनची जी माहिती मिळते तीच अपेक्षा आपल्या जोडीदाराकडून ठेवू नका. कदाचित तिला ते सारे आवडतही नसेल. .या गोष्टीसाठी पत्नीवर जबरदस्ती करू नका. 

ओरल सेक्स?

हा पुन्हा व्यक्तिगतच मुद्दा. काही महिलांना ते रुचते पण अनेकदा स्वच्छ अस्वच्छता, आरोग्य आणि मानसिक समज यामुळे अनेकींना ते आवडतही नाही.  

फोर प्लेक आवश्यक 

सेक्सचा आनंद घेण्यासाठी बऱ्याच महिलांना फोरप्लेची गरज असते. तुमचा जोडीदार कशाचा आनंद घेत आहे, हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करा. बरं फोरप्ले जास्त वेळ करण्याची गरज नाही. यासाठी काही मिनिटेदेखील पुरेसे असते. फोरप्ले योनीमध्ये नैसर्गिक ओलावा देण्यास मदत करते. यामुळे सेक्सचा आनंद दुप्पट होतो. 

रोमॅण्टिक व्हा

बेडरुममधलं, वातावरण, फुलं, सिनेमा, दोघांनी एकत्र जेवणे, गप्पा हे सारं रोमॅण्टिक असणंही जोडीदाराला आवडत असेल तर ते करा. 

घाई नको 

हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. सेक्स केल्यानंतर उठण्याची घाई करू नका. महिलांना अनेकदा सेक्स केल्यानंतर जोडीदाराला बिलगून झोपावेसे वाटते. कदाचित तुमच्या जोडीदाराचीही तीच इच्छा असेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी