पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांसाठी महत्त्वाच्या आहेत 'या' गोष्टी, यामुळे आयुष्य होईल सोपं

लाइफफंडा
भरत जाधव
Updated May 04, 2021 | 09:28 IST

आई होणं हे प्रत्येक स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. आई होण्याचा आनंद गगनापेक्षाही मोठ असतं. दरम्यान आई होत असताना स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप आवश्यक असतं.

these things which every woman should know before delivery
पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रियांनी 'या' गोष्टी ठेवा लक्षात  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • बाळाला आईची ऊब हवी असते
  • चिडचिडमुळे आरोग्यावर होतो परिणाम
  • योगभ्यासामुळे शांत राहण्यास मदत मिळते

नवी दिल्ली : आई होणं हे प्रत्येक स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. आई होण्याचा आनंद गगनापेक्षाही मोठ असतं. दरम्यान आई होत असताना स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप आवश्यक असतं.स्वत:ची काळजी घेणं आवश्यक असतं. विशेष म्हणजे याव्यतिरिक्त अजून अशा गोष्टी आहेत ज्या आई होण्याआधीच प्रत्येक स्त्रिला माहिती असाव्यात.

जेव्हा स्त्री आई बनते तेव्हा तिला विविध लोकांकडून विविध सल्ले मिळतात. कोणी तिला स्वत:ची खूप काळजी घेण्यास सांगते, कोणी बाळाची सर्वाधिक काळजी घेण्यास सांगते. परंतु अशा गोष्टी वा असे सल्ले कोणीच देत नाही ज्यामुळे स्त्रीची लाईफ अगदी सहज आणि सोप्पी होईल. अशा गोष्टी स्त्रीला माहित असायला हव्यात कारण त्याचा मोठा परिणाम आयुष्यावर पडतो. मात्र अशावेळी स्त्रीने स्वत:च्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे असते. आज आम्ही या लेखातून तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या जाणून घेतल्यावर नव्याने आई झालेली स्त्री आपले आयुष्य सामान्य पद्धतीने आणि तणावमुक्त व आनंदाने जगू शकते.

खांद्यांना मजबुती देणे

गरोदरपणाच्या काळात प्रत्येक जण गरोदर स्त्रीला पायांचा व्यायाम करण्याचा एकच सल्ला देतो जेणेकरून डिलिव्हरीमध्ये काही समस्या येऊ नये. पण कोणीच असे सांगत नाही की पायांप्रमाणेच हातांवर सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे, कारण हात सक्षम असणे सुद्धा महत्त्वाचे असते. हातांची भूमिका महत्त्वाची असते कारण डिलिव्हरी नंतर बाळाला दिवसाचे 24 तास आणि 7 आठवडे आईला घेऊन राहावे लागते. अशावेळी हातांमध्ये वेदना होणे आणि हातदुखी सुरू होणे साहजिक आहे. म्हणून गरोदरपणात हातांचे आणि खांद्याचे व्यायाम करून त्यांना बळकटी देणे महत्त्वाचे ठरते. 

स्वत:ला शांत ठेवावे

बाळाला तुमच्या शरिराची ऊब हवी असते. तुम्ही त्याला खाली ठेवलं तर त्याला जाणवते की आपल्याला मिळत असलेली ऊब थांबली आहे.  अशावेळी बाळ सैरभैर होऊन रडू लागते. लहान बाळांना भूक फार लागते. तुम्ही जेवणाआधी त्याला दूध पाजाल आणि मग मग जोवर तुम्ही आपले जेवण संपवाल तोवर बाळाला पुन्हा भूक लागलेली असेल. नेहमी त्याला आईची ऊब हवी असते, अशावेळी नव्या आई झालेल्या स्त्रिया चिडचिड करतात. याकरता स्त्रीने गरोदरपणा पासूनच स्वत:ला मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. यामध्ये योगभ्यास, मेडिटेशन, सुमधुर संगीत व छान छान पुस्तकं तुमची मदत करू शकतात.

 कमी शॉपिंग करणे

डिलिव्हरीनंतर पॅरेंट्स आपल्या बाळासाठी एवढे कपडे खरेदी करतात की त्यासाठी जागा देखील कमी पडते. विश्वास ठेवा की जन्मानंतर खूपच कमी गोष्टी जसे की डायपर, वाइप्स, काही कपडे, कॅप्स, नेपकिन्स, टॉवेल, बॉटल आणि अंघोळीसाठी गरजेचे सामान एवढ्याच गोष्टी हव्या असतात. ही गोष्ट आताच समजून घ्या की बाळ हळूहळू मोठे होणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी खरेदी करत असलेला प्रत्येक कपडा हळूहळू छोटा होत जाणार आहे. 

नेहमी आनंदी राहा

बाळाच्या जन्मानंतर अनेकदा आईच्या मनात असा विचार येतो की कदाचित ती चांगली आई नाही आहे. असे यामुळे होते कारण बाळाची जबाबदारी घेता घेता आणि स्वत:ची काळजी घेता घेता ती चिडचिड करू लागते. त्यावेळी लक्षात घेतलं पाहिजे की या सर्व सामान्य गोष्टी आहेत आणि हे प्रत्येक स्त्री सोबत घडतात. अशा विचारांपासून स्वत:ला दूर ठेवायचे असेल तर नेहमी आनंदी राहण्यावर भर द्या. चांगल्या गोष्टी वाचा आणि पहा व सतत हसत रहा. 

स्वत:ची खूप काळजी घ्या

डिलिव्हरी नंतर स्त्रियांवर इतक्या जबाबदाऱ्या येतात की स्त्रिया स्वत:ची काळजी घेण्यास कमी पडू लागतात. तिचे वर्तन बदलू लागते. ती दिवसागणिक निगेटिव्ह होऊ लागते. जर डिलिव्हरी नंतर स्त्रिया स्वत:ची योग्य काळजी घेऊ शकल्या नाहीत तर त्या पोस्टपार्टम डिप्रेशनला बळी पडू शकतात. गरोदरपणातच स्त्रीने स्वत:च्या मनाशी पक्क करावं की डिलिव्हरी नंतर पुरेशी झोप घ्यायची आहे. आपल्याला जास्तीत जास्त आराम करायचा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी