Wife Secrets: महिला कधीच पतीला सांगत नाहीत या ५ गोष्टी; जाणून घ्या स्त्रियांचे मुख्य ५ सीक्रेट

लाइफफंडा
Updated Jun 10, 2022 | 17:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Wife Secrets । पती-पत्नीच्या नात्याला खूप पवित्र मानले जाते. लग्नानंतर दोघेही कायमस्वरूपीसाठी एकमेकांचे होतात. दोघांमध्ये कधी कधी वाद होतो, पण या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वासाचा गोडवा असतो.

These things women never tell their husbands, Find out the top 5 secrets of women
महिला कधीच पतीला सांगत नाहीत या ५ गोष्टी, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पती-पत्नीच्या नात्याला खूप पवित्र मानले जाते.
  • बहुतांश महिलांचा कोणीतरी सीक्रेट क्रश असतोच.
  • नोकरी करणाऱ्या महिला आपल्या ऑफिसमधील गोष्टी पतीपासून लपवून ठेवतात.

Wife Secrets । मुंबई : पती-पत्नीच्या नात्याला खूप पवित्र मानले जाते. लग्नानंतर दोघेही कायमस्वरूपीसाठी एकमेकांचे होतात. दोघांमध्ये कधी कधी वाद होतो, पण या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वासाचा गोडवा असतो. खर तर प्रामुख्याने पती आणि पत्नीमध्ये कोणतेच गुपित नसते. मात्र तरीदेखील अशा काही बाबी आहेत, ज्या पत्नी आपल्या पतीला सांगण्यापासून संकोच करते. आज आपण अशाच काही बाबींबद्दल भाष्य करणार आहोत ज्या पत्नी आपल्या पतीपासून गुपित ठेवण्याचा प्रयत्न करते. (These things women never tell their husbands, Find out the top 5 secrets of women). 

अधिक वाचा : स्वतःशीच लग्न करणाऱ्या क्षमा बिंदूवर प्रश्नांचा भडीमार

  1. नातेवाईक आणि मुलांशी संबंधित गोष्टी - दरम्यान अनेक अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की महिला सतत आपल्या नातेवाईकांबद्दल चिंतेत असतात. मात्र याबाबत त्या कधीच आपल्या पतीला सांगत नाहीत. याशिवाय काही वेळा आपल्या मुलांबद्दलचे निर्णय देखील पतीच्या कानावर घालताना महिला संकोच करतात. 
  2. सीक्रेट क्रश - बहुतांश महिलांचा कोणीतरी सीक्रेट क्रश असतोच. याबाबतीत त्या कोणालाच नाही सांगत. अनेकवेळा महिला याबाबतीत त्यांच्या मैत्रिणींना सांगतात, पण त्यांच्या पतीपासून लपवतात. 
  3. बचत - महिला घरातील खर्चाशिवाय काही बचत जरूर करत असतात. त्या ज्या पैशाची बचत करतात त्याबाबतीत पतीला कधीच सांगत नाहीत. यामागील मुख्य कारण म्हणजे जर कधी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तर या पैशांचा वापर करता येईल.
  4. ऑफिसमधील गोष्टी - नोकरी करणाऱ्या महिला आपल्या ऑफिसमधील गोष्टी पतीपासून लपवून ठेवतात. त्यांचे ऑफिसमध्ये झालेले कौतुक देखील पतीच्या कानावर घालच नाहीत. मात्र महिला या बाबतीत त्यांच्या मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करतात. पत्नी असा यासाठी विचार करते की यामुळे त्यांच्या पतीला कमीपणा वाटेल. 
  5. शारीरिक समस्या - अनेकदा असे दिसून आले आहे की पत्नी आपल्या पत्नीपासून आरोग्याशी संबंधित गोष्टी लपवतात. पतीला त्रास होऊ नये म्हणून त्या असे करतात. याचे आणखी एक कारण हे देखील असू शकते की ती आपल्या पतीला याबद्दल सांगण्यास लाजतात. जसे की तिच्या गुप्तांगातील गाठी अथवा डाग याबद्दल पतीला सांगताना महिला संकोच करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी