Chanakya Niti In Marathi : या महिलांमुळे उजळते पतीचे नशीब, घर राहते आनंदी आणि सुखी समाधानी

Chanakya Niti In Marathi, women with these qualities are considered lucky for their husbands : जाणून घ्या चाणक्याच्या चाणक्य नितीनुसार कोणत्या महिलांना त्यांच्या पतीसाठी भाग्यवान मानले जाते.

Chanakya Niti
चाणक्य निती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • या महिलांमुळे उजळते पतीचे नशीब
  • घर राहते आनंदी सुखी समाधानी
  • जाणून घ्या चाणक्याच्या चाणक्य नितीनुसार कोणत्या महिलांना त्यांच्या पतीसाठी भाग्यवान मानले जाते

Chanakya Niti In Marathi, women with these qualities are considered lucky for their husbands : आचार्य चाणक्य यांची चाणक्य निती आजच्या काळात खूप लोकप्रिय आहेत. चाणक्याने आपल्या चाणक्य नितीमध्ये यश आणि समृद्धी मिळविण्यासाठी अनेक उपयुक्त गोष्टी सांगितल्या आहेत. असे सांगतात की जी व्यक्ती या गोष्टी आपल्या जीवनात अंगीकारते त्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते. चाणक्याची चाणक्य निती लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम करते. जाणून घ्या चाणक्याच्या चाणक्य नितीनुसार कोणत्या महिलांना त्यांच्या पतीसाठी भाग्यवान मानले जाते.

  1. धार्मिक विचारांची महिला : चाणक्य नितीनुसार धार्मिक विचारांची महिला आपल्या पतीचे भाग्य उजळवते. अशी महिला आपल्या सासूरवाडीचा स्वर्ग करते. धर्म मानणाऱ्या महिलेच्या घरात सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते, त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते.
  2. समाधानी महिला : चाणक्य नितीनुसार समाधानी महिला आपल्या पतीचे भाग्य बदलते. अशी महिला प्रत्येक कठीण क्षणात पतीच्या पाठीशी ठामपणे उभी असते. ही महिला जे आहे त्यात आनंद आणि समाधान मानते. 
  3. धाडसी महिला : चाणक्य नितीनुसार धाडसी महिला पतीसाठी नशीबवान समजली जाते. ही महिला घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीला शांतपणे सामोरी जाते. प्रसंगी संघर्ष करते आणि यशस्वी होते. पतीला चांगल्या वाईट परिस्थितीत उत्तम साथ देते. परिस्थितीशी लढण्यासाठी पतीचा आत्मविश्वास वाढवते. त्याचे प्रेरणास्थान बनते.
  4. शांत स्वभावाची महिला : चाणक्य नितीनुसार शांत स्वभावाची महिला पतीसाठी भाग्याची समजली जाते. ही महिला लवकर चिडत नाही. विनाकारण वाद घालत नाही. शांत स्वभावाची महिला घरातले वातावरण शांत, आनंदी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या महिलेच्या उपस्थितीत घरात कधीही भांडण होत नाही आणि झाले तर लवकर मिटते. ज्या घरात वाद होत नाही त्या घरावर लक्ष्मीची कृपा राहते. यामुळेच शांत स्वभावाची महिला पतीसाठी भाग्याची समजली जाते.
  5. गोड बोलणारी महिला : चाणक्य नितीनुसार गोड बोलणारी महिला अनेकांवर प्रभाव टाकते. या महिलेमुळे घरातले वातावरण उत्तम राहते. ही महिला पतीसाठी नशीबवान समजली जाते.

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 5 महत्त्वाचे विचार

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स

चाणक्य निती म्हणजे काय?

चाणक्य यांनी त्यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि  मगधच्या धनानंद राजाच्या जुलमातून प्रजेला सोडवण्यासाठी चंद्रगुप्तास प्रशिक्षित करून मगध जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. पुढे चाणक्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजसभेत महामंत्री झाले. चाणक्य हेच विष्णूगुप्त होते. त्यांना कौटिल्य या नावानेही ओळखले जात होते. जुलमी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात चाणक्य यांचा मुख्य सहभाग होता. 

चाणक्य यांनी रचलेला  कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक उत्तम ग्रंथ म्हणून ओळखला जातो. यात 25 प्रकरणे आणि 6 हजार श्लोक आहेत. ग्रंथाद्वारे अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण याबाबत मार्गदर्शन केले आहे. हा अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन करणारा पहिला मानवी ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथात नमूद निती ही चाणक्य निती किंवा दंड निती या नावाने ओळखली जाते. आचार्य चाणक्य हे महान अर्थतज्ज्ञ आणि कूटनिती तज्ज्ञ होते. त्यांनी लिहिलेली निती ही चाणक्य निती म्हणून ओळखली जाते. या चाणक्य नितीमध्ये कोणी कसे वागावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन आढळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी