ऑफिसमधील सहकाऱ्यांना 'या' गोष्टी सांगणे पडू शकते महागात

लाइफफंडा
Updated Aug 15, 2020 | 22:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Office tips: आपण ऑफिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांना अनेक गोष्टी सांगतो. पण ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Thing which one must not share with office colleagues
ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना या गोष्टी सांगणे पडू शकते महागात (प्रातिनिधीक फोटो) 

थोडं पण कामाचं

  • ऑफिसमध्ये विनाकारण वादांपासून दूर राहाणे गरजेचे
  • ऑफिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांना कधीही नावे ठेवू नका
  • कामाच्या ठिकाणी आपली प्रत्येक गोष्ट सांगणे टाळा

जेव्हा आपण नोकरी (job) करत असता तेव्हा आपले अनेक मित्र, सहकारी (colleagues) बनतात आणि त्यांच्यापैकी काही खूप जवळचे होऊन जातात ज्यांच्याशी खूप बोलणे (close interactions) होते. पण ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध गरजेचेच (good relations with colleagues) असते, पण हे करताना लक्षात ठेवा की त्यांना काही गोष्टी सांगणे कटाक्षाने (avoiding certain things) टाळायला हवे.

आता आम्ही आपल्याला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या आपल्या सहकाऱ्यांना सांगणे लक्षात ठेवून टाळायला हवे.

  1. आपल्या खासगी गोष्टी: ऑफिसमध्ये लोक काम करण्यासाठी येतात आणि त्यांना आपल्या खासगी गोष्टींशी काही कर्तव्य नसते. त्यामुळे आपल्या कुटुंबाबाबत किंवा नातेसंबंधांबाबतची माहिती आपल्यापर्यंत ठेवणे इष्ट असते. आपल्या कौटुंबिक बाबी, नात्यांमधले वादविवाद, आर्थिक अडचणी किंवा कामाव्यतिरिक्त मित्रांशी निगडित गोष्टी ऑफिसमध्ये न सांगणेच हितावह आहे.
  2. कंपनीबद्दल काही अडचण: प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या कामाबद्दल काही ना काही तक्रार असते. आपण सहकाऱ्यांच्या मदतीने ती सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. पण याबद्दल आपल्या सहकाऱ्यांना पुन्हापुन्हा सांगू नका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून उपाय शोधा.
  3. इतर सहकाऱ्यांवर टीका: जर आपल्याला आपल्या एखाद्या सहकाऱ्याविषयी तक्रार असेल तर आपल्या वरिष्ठांशी याबद्दल बोला. आपली तक्रार वैयक्तिक असेल तर थेट त्या व्यक्तीशी संवाद साधा, पण इतर सहकाऱ्यांशी याबद्दल कधीही बोलू नका.
  4. आपली कमाई आणि खर्च: कंपनी भलेही आपल्या कर्मचाऱ्यांना आपला पगार एकमेकांना सांगण्यापासून थांबवते, पण बऱ्याचदा लोकांना याबद्दल कळतेच. तरीही याबद्दल खुल्या चर्चा करण्याची गरज नसते. 
  5. आपली सोशल नेटवर्किंग लाईफ: आजकालचा काळ सोशल मीडियाचा आहे. आपले ऑनलाईन आयुष्य ऑफिसमध्ये चर्चेचा विषय बनू शकते. आपली सोशल नेटवर्किंग लाईफ आपल्या व्यावसायिक जीवनापासून वेगळी ठेवा. आपले स्टेटस किंवा ब्लॉगवर मांडलेल्या आपल्या विचारांवरून ऑफिसमध्ये लोक आपल्याविषयी मते बनवू शकतात.
  6. ऑफिसमध्ये कुणी खास असेल तर: ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती पसंत असेल, आवडत असेल तर ते स्वतःपुरतेच ठेवा. सहकाऱ्यांशी यावर चर्चा करणे शाळा किंवा कॉलेजच्या वयात ठीक आहे, पण ऑफिसमध्ये नाही. यामुळे फक्त आपलीच नव्हे, तर त्या व्यक्तीचीही व्यावसायिक छबी खराब होऊ शकते.

या सर्व गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा आणि आपली ऑफिसमधील नाती चांगली राखा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी