Teach things to daughters: मुलींना जरूर शिकवा ‘या’ गोष्टी, स्वावलंबी व्हायला होईल मदत

आजच्या काळात अग्रेसर राहण्यासाठी आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी मुलींना लहानपणापासूनच काही मूल्यं शिकवण्याची गरज आहे. लहानपणापासूनच जर मुलींना योग्य शिकवण दिली, तर भविष्यात त्या स्वावलंबी होऊ शकतात आणि आपल्या अटींवर आणि आवडीनुसार आयुष्य जगू शकतात.

Teach things to daughters
मुलींना जरूर शिकवा ‘या’ गोष्टी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पालकांनी मुलींना काही मूल्यं शिकवण्याची गरज
  • इतरांसोबत स्वतःची काळजी घेण्याची द्यावी शिकवण
  • स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सवय लावणे आवश्यक

Teach things to daughters: सध्याच्या काळात मुली (Girls) या मुलांपेक्षा कुठल्याच बाबतीत कमी नाहीत. करिअर (Career) असो किंवा आयुष्यातील इतर कुठलंही क्षेत्र, मुलांप्रमाणेच मुलीदेखील स्वतःच्या पायावर उभ्या असून यशाची नवनवी क्षेत्रं पादाक्रांत करत असल्याचं दिसतं. आजच्या काळात अग्रेसर राहण्यासाठी आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी मुलींना लहानपणापासूनच काही मूल्यं (Values) शिकवण्याची गरज आहे. लहानपणापासूनच जर मुलींना योग्य शिकवण दिली, तर भविष्यात त्या स्वावलंबी होऊ शकतात आणि आपल्या अटींवर आणि आवडीनुसार आयुष्य जगू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला पटणारी भूमिका त्या घेऊ शकतात आणि त्यावर ठाम राहू शकतात. 

स्वतःची काळजी घेणे

बहुतांश घरांमध्ये मुली इतरांची काळजी घेत असतात. मात्र स्वतःची काळजी घेताना दिसत नाहीत. मात्र आपल्या मुलीला स्वतःची काळजी घेण्याची कला पालकांनी शिकवणं गरजेचं आहे. इतरांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुली नेहमीच प्रयत्न करत असतात. मात्र स्वतःच्या इच्छा नाही तेवढेच प्राधान्य देणे आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षण त्यांना देण्याची गरज असते. कुटुंबातील इतर सर्व सदस्यांप्रमाणेच स्वतःच्या इच्छेलादेखील तितकेच महत्त्व असल्याचे त्यांना पालकांनी पटवून देणे गरजेचे आहे.

अधिक वाचा - Tasteless Candy: कंपनीने बनवली कुठलीही चव नसलेली टॉफी, कारण आहे मजेशीर

स्वतःचे निर्णय स्वतः घेणे

आपले निर्णय स्वतः घेण्याची सवय लहानपणापासूनच मुलींना लावणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात कुठलाही निर्णय घेण्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. आयुष्यातील महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्यांचा थरकाप उडणार नाही किंवा त्या गोंधळूनही जाणार नाहीत.

आपल्या अधिकारांसाठी लढणे

आजही अनेक ठिकाणी घरातील महिलांचे अधिकार हिसकावून घेण्याचे प्रकार घडतात. शिक्षण असो किंवा नोकरी असो, त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे अनुभवही येतात. या सर्व ठिकाणी आपल्या अधिकारांसाठी महिलांना झगडावं लागतं. आपले अधिकार किती मोलाचे आहेत, याचं महत्त्व आपल्या मुलींना पटवून देणं आणि आपल्या अधिकारांसाठी तिला झगडायला लावणं, या बाबी तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहेत. पालकांनी स्वतःच आपला मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करण्यापासून या गोष्टीची सुरुवात करावी. 

अधिक वाचा - Parenting Tips: या 5 गोष्टींचा मुलांवर होतो विपरित परिणाम...टाळा या चुका

वेळेचं महत्त्व ओळखणे

आपल्या मुलींना वेळेचा आदर करणे आणि योग्य प्रकारे योग्य तो निर्णय घेणे, या बाबी शिकवणे आवश्यक आहे. त्यामुळे योग्य वेळेत त्या आपल्यासाठी योग्य तो निर्णय घेऊ शकतात. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी, सर्व प्रश्नांचा योग्य तो विचार करणे आवश्यक असल्याचे शिक्षण त्यांना पालकांनी द्यायला हवे. आपल्या आयुष्यातील एक चुकीचा निर्णय अनेक गोष्टींवर परिणाम करणारा ठरू शकतो, याची जाणीवही त्यांना करून देण्याची गरज आहे. 

डिस्क्लेमर - सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही टिप्स आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी