या पाच गोष्टी सांगतील किती काळ टिकणार तुमचं लग्न?

लाइफफंडा
Updated Jun 27, 2020 | 17:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Relationship: तुमचे वैवाहिक जीवन किती दीर्घकाळ टिकणार? याचा विचार तुम्ही केला आहे का? या पाच गोष्टींवरून जाणून घ्या तुमचे नाते किती काळ टिकणार

couple
या पाच गोष्टी सांगतील किती काळ टिकणार तुमचं लग्न? 

थोडं पण कामाचं

  • तुमच्या लग्नाबाबत अद्याप तुमच्या मनात प्रश्न आहेत का?
  • तुम्हाला माहीत आहे का तुमचे लग्न किती काळ टिकणार?
  • या पाच गोष्टींवर अवलंबून आहे तुमचे नाते

मुंबई: प्रत्येकाला वाटते की त्याचे वैवाहिक जीवन(married life) नेहमी आनंदाने भरलेले असावे. मात्र प्रत्येकाच्या मनात आपल्या लग्नाबद्दल एक भीती असते की त्यांचे नाते(relaionship) चांगले आणि मजबूत राहील की नाही अथवा त्यांचा पार्टनर त्यांना प्रत्येक निर्णयात साथ देईल की नाही. 

कोणत्याही नात्याबाबत जेव्हा अनेक प्रश्न डोकावू लागतात तेव्हा याचा चुकीचा परिणाम नात्यावर होऊ लागतो. यासाठी आपल्या नात्यावर विश्वास ठेवा आणि केवळ चांगल्या गोष्टींचा विचार करा. आम्ही तुम्हाला अशा काही सकारात्मक गोष्टी सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचे लग्न किती काळ टिकणार

नेहमी एकमेकांबद्दल विचार करणे

कोणत्याही नात्यात एखाद्या गोष्टीवर एकमत नसणे आणि त्यावरून भांडण होणे ही साधारण गोष्ट आहे. मात्र भांडणानंतरही तुम्ही जर एकमेकांची काळजी घेत असाल आणि तुमचा पार्टनर ठीक आहे की नाही याची काळजी असेल तर हे चांगले संकेत आहेत. तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता आणि तुमचे लग्न दीर्घकाळ टिकेल. 

एकमत असणे

अनेकदा एखाद्या गोष्टींवर एकमेकांबाबत असहमती असणे ठीक आहे मात्र गरजेच्या गोष्टींवरून तुमचे एकमत होत असेल मग ती गोष्ट कुटुंबाची असो वा पैशासंबंधित. जर तुमच्या दोघांची मते जुळत असेल तर आयुष्यात तुम्ही लहान लहान गोष्टींवरून दुखावले जाणार नाहीत.

एकमेकांसोबत विश्वास असणे

कोणत्याही नात्यात विश्वास आणि इमानदारी असणे गरजेचे आहे. तरच नाते दीर्घकाळ टिकते. जर तुमच्या आयुष्यात काही ठीक नसेल  मात्र तुमचा एकमेकांवर विश्वास असेल आणि तुम्ही मानत असाल की सगळं शक्य आहे तर गोष्टी नक्कीच सुरळीत होतील.

एकमेकांना प्राथमिकता देणे

जर तुम्ही एकमेकांना प्राथमिकता देत असाल तर स्पष्ट आहे की तुम्ही त्यांचयावर प्रेम करता आणि त्यांची इज्जत करता. जर तुम्ही दोघेही काम, मित्र आणि नातेवाईकांआधी आपल्या पार्टनरला समजता कर तुमचे नाते खूप मजबूत आणि दीर्घकाळ टिकार असेल.

एकत्र वेळ घालवायला आवडते

लग्नाला काही वेळ झाल्यानंतर लोक एकमेकांसोबत वेळ घालवण्यापेक्षा इतर गोष्टींना अधिक महत्त्व देऊ लागतात. जर तुम्ही  दोघे अजूनही  एकमेकांसोबत वेळ घालवत असाल तर तुमचे नाते दीर्घकाळ टिकणारे असेल आणि तुम्ही एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी