या अभिनेत्रींनी लपवली होती प्रेग्नंसी, कोणत्या महिन्यात good news द्यावी

लाइफफंडा
Updated Sep 08, 2020 | 17:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

pregnancy news: अनेक बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रीने आपली प्रेग्नंसीची न्यूज लपवली होती. अनेकांचे बेबी बंप दिसायला लागल्यानंतर त्यांनी ही बातमी जगाला सांगितली. 

anushka sharma
कोणत्या महिन्यात good news देणे आहे सुरक्षित 

थोडं पण कामाचं

  • अनेक महिला तसेच अभिनेत्रीही आपली प्रेग्नंसीची बातमी लगेचच सगळ्यांना सांगत नाहीत.
  • गर्भावस्थेतील पहिले तीन महिने आईच्या शरीरातील बदल तसेच बाळाच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात.
  • प्रेग्नंट राहिल्यानंतर ८व्या आठवड्याच्या जवळपास अथवा याआधी पहिले प्रीनॅटल चेकअप होते.

मुंबई: प्रेग्नंसीच्या सुरूवातीच्या महिन्यांमध्ये गर्भपाताचा धोका अधिक असतो याच कारणामुळे अनेक महिला तसेच अभिनेत्रीही आपली प्रेग्नंसीची बातमी लगेचच सगळ्यांना सांगत नाहीत. जेव्हा तुम्हाला समजते की तुम्ही प्रेग्नंट आहात तेव्हा तुम्हाला ही बातमी साऱ्यांना द्यावीशी वाटते. मात्र मनात असाही प्रश्न यावेळी येतो की ही बातमी देण्याची ही योग्य वेळ आहे का?

कोणत्याही जोडप्याला आपली प्रेग्नंसीचे तीन महिने पूर्ण होण्यापर्यंत वाट बघितली पाहिजे. याचे १३ आठवडे पूर्ण करण्यामागे अनेक कारणे आहेत. याच कारणांमुळे सुरूवातीचे १३ आठवडे प्रेग्नंसीबद्दल कोणालाही सांगितले जात नाही. 

गर्भावस्थेतील पहिले तीन महिने आईच्या शरीरातील बदल तसेच बाळाच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात. प्रेग्नंट झाल्यानंतर १० ते २५ टक्के महिलांचा गर्भपात होतो ज्यात ८० टक्के गर्भपात पहिल्या तीन महिन्यांमध्ये होतो. यातील सर्वाधिक गर्भापात होण्याचे कारण म्हणजे बाळाची वाढ योग्य पद्धतीने न होणे होय. 

गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीमध्ये आई अस्वस्थ असल्याकारणाने, मासिक पाळीच्या चक्रात समस्या, हार्मोनल इम्बॅलन्स आणि गर्भाशयात स्कार टिश्यूच्या कारणामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. 

अनेक जोडपी आपले पहिले प्रीनॅटल चेकअप पूर्ण होण्यापर्यंत वाट पाहतात. प्रेग्नंट राहिल्यानंतर ८व्या आठवड्याच्या जवळपास अथवा याआधी पहिले प्रीनॅटल चेकअप होते. जर डॉक्टरांनी सगळ काही चांगल असल्याची ग्वाही दिली तर ही जोडपी ही गुड न्यूज आपला मित्र परिवार तसेच नातेवाईकांना ही खुशखबर देतात. 

या अभिनेत्रींनी लपवली होती गुडन्यूज

अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री असिनने आपल्या प्रेग्नंसीची बातमी नवव्या महिन्यापर्यंत लपवून ठेवली होती. तसेच राणी मुखर्जीच्याही प्रेग्नंसीी बातमी मीडियासमोर आली नव्हती. अभिनेत्री गुल पनागनेही आपल्या आई बनण्याची बातमी जेव्हा तिचा मुलगा सहा महिन्यांचा झाला तेव्हा दिली होती. या यादी टीव्ही अभिनेत्री पंछी बोरा, मिहिका वर्मा, सौम्या सेठ, परिधी शर्मा आणि संजीदा शेख यांच्या नावांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी