ईशा अंबानीसाठी या डिझायनरने शुद्ध सोन्याने तयार केला लेहेंगा, इतिहासात पहिल्यांदाच झाले असे

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी पीरामल भारताची फॅशन क्वीन आहे. ईशाजवळ डिझायनर ड्रेसेसचे उत्तम कलेक्शन आहे आणि तिच्यासमोर चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही फिक्या पडताना दिसून येतात.

Isha Ambani gold lehenga
ईशा अंबानीसाठी या डिझायनरने शुद्ध सोन्याने तयार केला लेहेंगा, इतिहासात पहिल्यांदाच झाले असे  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • इतिहासात पहिल्यांदाच झाले असे काहीतरी
  • ईशाने घातला इटालियन डिझायनर लेहेंगा
  • जाणून घ्या या लेहेंग्यातील विशेष गोष्टी

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांची मुलगी (daughter) ईशा अंबानी पीरामल (Isha Ambani Piramal) हिला भारतीय पारंपरिक कपड्यांची (Indian traditional clothes) आवड आहे आणि ती अनेकदा अशा पोशाखांमध्ये दिसून येते. तिचा असाच वेश मेट गालाच्या (Met Gala) कार्यक्रमात पिंक कार्पेटवर (pink carpet) दिसला होता. तसेच आपल्या लग्नात तिने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला 16 पॅनल्सचा कशिदाकाम केलेला लेहेंगा (Lehenga) परिधान केला होता. ती आपल्या शैलीने बॉलिवुडमधील अभिनेत्रींनाही (Bollywood actresses) टक्कर देत असते.

इतिहासात पहिल्यांदाच झाले असे काहीतरी

आपल्या पारंपरिक कलेक्शनमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या ईशा अंबानी आपल्या विवाहाच्या रिसेप्शनमध्ये सोन्याच्या तारांनी तयार केलेला लेहेंगा घालून सर्वांनाच चकित केले. 2018मध्ये आनंद पीरामलशी विवाह केलेल्या ईशाने आपल्या विवाहात सब्यसाची, अबू जानी संदीप खोसला ते मनीष मल्होत्रा अशा डिझायनर्सचे लेहेंगे परिधान केले होते. मात्र तिने घातलेला व्हॅलेंटीनो गोल्ड रिसेप्शन लेहेंगा सर्वात खास ठरला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Valentino (@maisonvalentino)

ईशाने घातला इटालियन डिझायनर लेहेंगा

तिचा हा सोन्याच्या तारांचा लेहेंगा इटालियन डिझाईनचा होता. तो पहिल्यांदा फॅशन हाऊस व्हॅलेंटीनो यांनी डिझाईन केला होता. व्हॅलेंटीनो यांनी प्रियंका, ऐश्वर्या आणि सोनम कपूर अशा बॉलिवुड अभिनेत्रींसाठी अनेक गाऊन्स डिझाईन केले आहेत. पण लेहेंगा त्यांनी फक्त ईशा अंबानींच्या खास मागणीवरून डिझाईन केला होता.

जाणून घ्या या लेहेंग्यातील विशेष गोष्टी

ईशाच्या या क्लासिक गोल्ड आणि आयव्हरी लेहेंग्यात सोन्याच्या आणि चांदीच्या धाग्यांचे काम होते. हा इटालियन फॅशन हाऊसद्वारे डिझाईन केलेला कस्टममेड लेहेंगा होता ज्यातील कारागिरी ईशाच्या पसंतीनुसार केली गेली होती. यात 12 पॅनल्स होते आणि प्रत्येक पॅनल क्रिस्टल आणि सेक्विनसह हायलाईट करण्यात आला होता. यातील खालचा भाग सोने आणि चांदीच्या फुलांच्या डिझाईनने सजवण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी