Vastu Tips: घरात पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवा ही छोटी गोष्ट, कधीच भासणार नाही पैशाची कमतरता!

लाइफफंडा
Updated May 27, 2022 | 21:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips for Money: खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल किंवा सतत नुकसान होत असेल तर यामागे शनि कारण असू शकतो. पत्रिकेत शनि अशुभ स्थितीत असेल तर व्यक्ती आर्थिक प्रगती करू शकत नाही.

This small thing keep in the house, never be a shortage of money
घरात घोड्याची नाल ठेवा, पैशाची कमतरता जाणवणार नाही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तिजोरीत ठेवा घोड्याची नाल
  • पैशाची कमतरता भासत असल्यास तिजोरीत ठेवा घोड्याची नाल
  • शनि अशुभ स्थानात असल्यास आर्थिक प्रगतीत येतो अडथळा

Vastu Tips for Money: ज्योतिषशास्त्रात, शनि ग्रहाला खूप महत्त्व दिले गेले आहे कारण तो जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रभाव टाकतो. अशुभ शनीचा धन, मान-सन्मान, आरोग्य, नातेसंबंध इत्यादींवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे कुंडलीत शनीची ग्रहस्थिती असेल किंवा शनीची महादशा चालू असेल तर शनीच्या वाकड्या नजरांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय करावेत. शनीच्या ग्रहामुळे येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात सांगितलेला एक उपाय खूप प्रभावी आहे.


घोड्याची नाल वापरणे ठरते फायदेशीर


शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनिशी संबंधित वस्तू दान करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय शनिदोषापासून आराम मिळवण्यासाठी घोड्याची नाल खूप प्रभावी मानली जाते. त्यामुळे शनिदोषाने पीडित व्यक्तीला घोड्याच्या नाळेची अंगठी घालण्यास सांगितले जाते. त्याच वेळी, घर आणि दुकानाच्या बाहेर घोड्याचा नाल ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने व्यक्तीच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात आणि शनीच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळते.


तिजोरीत ठेवा घोड्याची नाल


पैशाच्या बाबतीत, समस्या तुमची पाठ सोडत नसतील, सतत नुकसान होत असेल, उत्पन्नात अडथळे येत असतील, तर घोड्याच्या नालचा उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यासाठी घरातील तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा, यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. या उपायाने शनिदेवाची कृपा होईल आणि लवकरच तुमचे उत्पन्न वाढू लागेल, तसेच नुकसानही कमी होईल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी