लग्नानंतर संबंधात रोमांच ठेवण्यासाठी हा  जालीम उपाय... 

लाइफफंडा
Updated Jan 08, 2020 | 19:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

 ज्या कपल कामानिमित्त एक दुसऱ्यांपासून दूर राहतात, त्यांच्यात प्रेम अधिक असते. तसेच जवळीकता कायम राहतात. 

this is the secret of happy relationship sex news in marathi google news
लग्नानंतर संबंधात रोमांच ठेवण्यासाठी हा  जालीम उपाय...   |  फोटो सौजन्य: Indiatimes

 मुंबई :  आनंदी राहण्यासाठी कायम सोबत राहण्याची गोष्ट आता जुनी झाली आहे. एका अभ्यासात समोर आले आहे की, जे कपल कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहतात, ते एकमेकांना अधिक प्रेम करतात. त्यांच्यात कायम जवळीकता असते. याची जाणीव तेव्हा होते जेव्हा ते एकमेकांपासून अनेक दिवस दूर राहतात. 
 
 पण दूर राहण्याचा काळ पाच दिवसांपेक्षा अधिक असता कामा नये. ब्रिटनेच्या ट्रॅव्हेलॉज हॉटेलकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे २००० जणांनी भाग घेतला. सर्वेत आलेल्या निकालानुसार दहा पैकी चार लोक आपल्या रिलेशनशीपशी खूश आहेत. जे आपल्या कामासाठी आपल्या पार्टनरपासून काही काळासाठी दूर असतात. 
 
 ट्रॅव्हलॉजमध्ये अकाउंट खात्यात काम करणारे ३५ वर्षीय रिचर्ड स्कॉट नेहमी कामानिमित्त आपल्या पत्नीपासून दूर असतात. त्याच्यामते काळानुसार काही दिवस कपलने वेगळे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे एक दुसऱ्याची किंमत कळते. 
 
 सर्वेमध्ये काही लोक या गोष्टीने खुश असतात की कामामुळे ते बाहेर गावी जातात आणि हॉटेलच्या मोठ्या रूममध्ये एकटेच निश्चिंत राहू शकतात. काही दिवस घरापासून दूर राहिल्याने  रोजच्या कटकटीपासून टाळली जाते, त्यामुळे मेंदू फ्रेश राहतो. 


 
तसेच १० पैकी चार लोकांचे म्हणणे आहे की, घरापासून काही काळ दूर राहिल्यावर ते घरी परतल्यावर त्यांचे स्वागत खास पद्धतीने होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...