Vastu Tips: घरात चुकूनही लावू नये सात घोड्यांचा असा फोटो, पडतो नकारात्मक प्रभाव

लाइफफंडा
Updated May 13, 2022 | 09:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips । ज्योतिषशास्त्रात वास्तूला खूप महत्त्व दिले जाते. दरम्यान यामध्ये घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. ज्याच्या साहाय्याने जीवनात आनंद मिळू शकतो.

This photo of seven horses Should not be applied by mistake in the house
घरात चुकूनही लावू नये सात घोड्यांचा असा फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रात वास्तूला खूप महत्त्व दिले जाते.
  • यामध्ये घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत.
  • वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कधीच घोड्यांचा असा फोटो लावू नये ज्यातील घोडे वेगवेगळ्या दिशांना धावताना दिसत आहेत.

Vastu Tips । मुबंई : ज्योतिषशास्त्रात वास्तूला खूप महत्त्व दिले जाते. दरम्यान यामध्ये घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. ज्याच्या साहाय्याने जीवनात आनंद मिळू शकतो. यापैकी एका म्हणजे घरात सात धावत्या घोड्यांचे फोटो सांगितले आहे. घरातील हा फोटो अथवा चित्र गती, यश आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. (This photo of seven horses Should not be applied by mistake in the house). 

अधिक वाचा : या पदार्थांसोबत चुकूनही खाऊ नका दही, वाचा सविस्तर

वास्तुशास्त्रानुसार हे सात पांढरे घोडे शुभ अंक मानले जातात. घरांमध्ये किंवा ऑफिसमध्ये सात धावणाऱ्या घोड्यांचे फोटो तुम्ही अनेकदा पाहिले असतील. असे म्हणतात की हे घरामध्ये लावल्याने संपत्तीसोबत समृद्धीही येते. पण वास्तुशास्त्रात घोड्यांचे फोटो लावताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घरामध्ये घोड्याचे फोटो लावणे अशुभ मानले जाते असे सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक

घरामध्ये ७ घोड्यांचा फोटो लावू नये

१) वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये कधीच घोड्यांचा असा फोटो लावू नये ज्यातील घोडे वेगवेगळ्या दिशांना धावताना दिसत आहेत. नेहमी एका दिशेला धावणाऱ्या घोड्यांचे फोटो अथवा चित्रे लावावीत. असे करणे शुभ मानले जाते. 

२) घरात किंवा ऑफिसमध्ये सातपेक्षा कमी किंवा सातपेक्षा जास्त घोड्यांचे फोटो कधीही लावू नका. यामुळे वास्तुदोष निर्माण होतात.

३) घरामध्ये घोड्यांचे असे चित्र चुकूनही लावू नका ज्यात घोड्याचा चेहरा रागावलेला दिसतो. त्यामुळे घरात कलह वाढतो.

४) वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही एकट्या घोड्याचे चित्र लावू नका. यामुळे आर्थिक संकट येऊ शकते.

५) वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये घोड्याचे चित्र असणे शुभ मानले जाते. पण घोड्याचे हे चित्र युद्धस्थळाचे नसावे. कारण याचा घरावर नकारात्मक परिणाम होतो.

६) घरामध्ये कधीही रथ ओढताना दिसणार्‍या घोड्याचे चित्र लावू नका.

७) घरात सात घोड्यांचे चित्र नेहमी फक्त आणि फक्त पांढऱ्या रंगाचे ठेवावे. कारण पांढरा रंग हा शांततेचे प्रतिक मानला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी