Skin Care Tips: यंदा रक्षाबंधनाचा वाचवा पार्लर खर्च, 'या' घरगुती Beauty Tips मिळवा एक नंबर Glowing Skin

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 08, 2022 | 17:06 IST

Beauty Tips:पार्लरमध्ये गेल्या साहजिकच भरपूर पैसा खर्च होतो. जर यावेळी रक्षाबंधनासाठी घरच्या घरी तुम्हांला ग्लोईंग स्किन (Glowing Skin)मिळाली तर. तेही एकही पैसे खर्च न करता.. होय, आम्ही तुम्हाला तुमच्या त्वचेनुसार घरच्या घरी काही टिप्स देत आहोत.

Beauty Tips
फॉलो करा 'या' घरगुती Beauty Tips 
थोडं पण कामाचं
  • यंदा 11 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच गुरूवारी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे.
  • तुमच्या त्वचेनुसार घरच्या घरी काही टिप्स देत आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही ग्लोइंग स्किन मिळवू शकणार आहात.
  • महिला वर्ग रक्षाबंधनाच्या दिवशी वर्षातून एकदा त्यांच्या भावाला इम्प्रेस करायला तयार असतात. याची तुम्ही आधीच खूप तयारी करत असता.

नवी दिल्ली: Rakshabandhan Skin Care Tips:  यंदा 11 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच गुरूवारी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे.  बहीण-भावाच्या पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात. पण एखादा कोणताही सण येताच महिलांची पावलं पार्लरच्या दिशेनं वळतात. सण म्हटलं तर पैसे खर्च होणारच. मग पार्लरमध्ये गेल्या साहजिकच भरपूर पैसा खर्च होतो.  जर यावेळी रक्षाबंधनासाठी घरच्या घरी तुम्हांला ग्लोईंग स्किन  (Glowing Skin)मिळाली तर. तेही एकही पैसे खर्च न करता.. होय, आम्ही तुम्हाला तुमच्या त्वचेनुसार घरच्या घरी काही टिप्स देत आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही ग्लोइंग स्किन मिळवू शकणार आहात. 

महिला वर्ग रक्षाबंधनाच्या दिवशी वर्षातून एकदा त्यांच्या भावाला इम्प्रेस करायला तयार असतात. याची तुम्ही आधीच खूप तयारी करत असता. चला जाणून घेऊया हे घरगुती उपाय (Home Remedies) जे तुम्हाला घरी करून पाहता येतील. 

अधिक वाचा-  'स्टफ्ड क्रीम चॉकलेट कुकीज' ची सोपी रेसिपी

तेलकट त्वचा ( oily skin)

तेलकट त्वचेसाठी तुम्ही मुलतानी माती वापरू शकता. यासाठी मुलतानी मातीत गुलाबपाणी टाकून पेस्ट तयार करा. आता चेहरा स्वच्छ केल्यानंतर ते लावा आणि अर्ध्या तासानंतर त्वचा धुवा. पॅक लावल्यानंतर डोळ्यांवर पार्लर सारखं फिलिंग येण्यासाठी तुम्ही कापसावर गुलाबजल लावून ते डोळ्यावर ठेवा. यामुळे तुम्हाला खूप आराम वाटेल.
 
कोरड्या त्वचेसाठी उपाय (dry skin) 

फळे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी चांगली असतात. केळी, संत्री आणि पपई मिक्स करून तुम्ही फेस पॅक तयार करू शकता. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो तसेच डेड स्किन दूर होण्यास मदत होते.

कूलिंग मास्क घरीच बनवा (Make cooling mask at home)

फेस पॅक केल्यानंतर चेहऱ्याची जळजळ आणि खाज कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी कूलिंग मास्क तयार करू शकता. यासाठी काकडीच्या रसात दूध आणि अंड्याचा पांढरा भाग मिसळा. आता हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा आणि काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी