Earth Day 2022: या थीमसह साजरा केला जातोय यंदाचा पृथ्वी दिवस; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास 

लाइफफंडा
Updated Apr 22, 2022 | 13:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Earth Day 2022 । दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस (Earth Day) म्हणून साजरा केला जातो. यंदाही हा दिवस २२ एप्रिल शुक्रवार या दिवशी साजरा केला जात आहे.

 This year's Earth Day is celebrated with 'Invest In Our Planet' theme
या थीमसह साजरा केला जातोय यंदाचा पृथ्वी दिवस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • वसुंधरा दिन २०२२ साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश प्रदूषणात होणारी प्रचंड वाढ आहे.
  • पृथ्वी दिवस २०२२ ची थीम 'आमच्या प्लॅनेटमध्ये गुंतवणूक करा' अशी आहे.

Earth Day 2022 । मुंबई : दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस (Earth Day) म्हणून साजरा केला जातो. यंदाही हा दिवस २२ एप्रिल शुक्रवार या दिवशी साजरा केला जात आहे. वसुंधरा दिन २०२२ साजरा करण्यामागचा उद्देश प्रदूषणात होणारी प्रचंड वाढ आणि पर्यावरणाला दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे हानी पोहोचवणाऱ्या इतर क्रियाकलापांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. (This year's Earth Day is celebrated with 'Invest In Our Planet' theme). 

 पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्रदूषण आणि धुके यांसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी वसुंधरा दिन साजरा करण्याची कल्पना मांडली होती. १९७० च्या दशकात सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी पर्यावरणाचा प्रचार करण्यासाठी आणि पृथ्वीभोवतीच्या चिंतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी या दिवसाची स्थापना केली होती.

अधिक वाचा : दिल्लीतील रोहिणी कोर्टाच्या परिसरात गोळीबार

थीम (Earth Day 2022 Theme) 

दरवर्षी नवनवीन आव्हाने लक्षात घेऊन वसुंधरा दिनासाठी एक थीम निवडली जाते आणि त्या थीमनुसार लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातात. आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस २०२२ ची थीम 'आमच्या प्लॅनेटमध्ये गुंतवणूक करा' ('Invest In Our Planet') अशी आहे. म्हणजेच पृथ्वी आणि तिची जैवविविधता वाचवण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा हा या थीमचा उद्देश आहे. तसेच या वसुंधरा दिनाची थीम जगातील सर्वात मोठ्या धोक्याचा म्हणजेच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उपाय शोधण्यावर केंद्रित आहे.

या दिवसाचा इतिहास (Earth Day History) 

संयुक्त राष्ट्र महासभेने २००९ मध्ये मंजूर केलेल्या ठरावाद्वारे २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस म्हणून निवडला. पण या विषयाशी निगडित इतिहास पाहता १९७० च्या दशकात स्टॉकहोमने लोकांना पर्यावरणाविषयी जागरूक करण्याचे काम केले. नंतर १९९२ मध्ये पर्यावरण आणि विकास या विषयावर १७८ हून अधिक सरकारने रिओ दि जानेरो अर्थ समिटमध्ये चर्चा केली. तेव्हापासून संयुक्त राष्ट्र हा विशेष दिवस आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिवस म्हणून साजरा करत आहे.

अर्थ डे चे महत्त्व (Earth Day Significance)

वसुंधरा दिवशी लाखो लोक पर्यावरण आणि त्याच्याशी संबंधित समस्यांबद्दल बोलण्यासाठी एकत्र येतात. येणाऱ्या पिढीला या गंभीर विषयाची जाणीव व्हावी यासाठी अनेक ठिकाणी या गंभीर विषयावर बोलण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षी गुगलने (Google) हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अॅनिमेशनची सीरिज तयार केली आहे. गुगल सर्चच्या होमपेजला भेट दिल्यास दर तासाला तुम्हाला हवामान बदलाची चित्रे पाहायला मिळतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी