Diwali 2021: दिवाळीपूर्वी या अशुभ गोष्टी घराबाहेर फेकून द्या; पैशांचा पाऊस पडेल

Diwali 2021, shower of money: घरातील अशुभ गोष्टी धनाची देवी लक्ष्मीला आवडत नाहीत. ती अशा घरात राहत नाही जिथे अशूभ गोष्टी आहेत, म्हणूनच तुम्ही विसरूनही अशी चूक करू नका.

Throw these ominous things home before Diwali; There will be a shower of joy
दिवाळीपूर्वी या अशुभ गोष्टी घराबाहेर फेकून द्या; पैशांचा पाऊस पडेल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अशुभ गोष्टींद्वारे नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते
  • नकारात्मक ऊर्जेचा वाईट परिणाम होतो
  • घरामध्ये अशुभ गोष्टींमुळे पैशाची कमतरता भासू शकते

shower of money, Diwali 2021: दिवाळीला आता अवघा काहीच अवधी उरला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनीच दिवाळीच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. दिवाळीपूर्वी लोक आपले घर स्वच्छ करतात. बहुतेक लोक दिवाळीच्या आधी घराला रंगरंगोटी करून घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का? दिवाळीच्या साफसफाईमध्ये घरातील काही वस्तू काढून टाकणे खूप गरजेचे असते. ज्या घरात या अशुभ गोष्टी असतात, त्या घरात धनाची देवी लक्ष्मी वास करत नाही. त्या घरात पैशाची कमतरता जाणवत राहते.. चला तर जाणून घेऊया दिवाळीपूर्वी घरातून कोणत्या अशुभ गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे. (Throw these ominous things home before Diwali; There will be a shower of money)

बंद पडलेले घड्याळ घरातून काढून टाका....

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बंद पडलेले घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. धावणारे घड्याळ हे आनंदाचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. तुमच्या घरात एखादे बंद किंवा तुटलेले घड्याळ असेल तर ते दिवाळीपूर्वी घरातून काढून टाका.घरात तुटलेले फर्निचर ठेवू नका


वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेले फर्निचर ठेवणे अशुभ असते. 

याचा घरावर वाईट परिणाम होतो. तुमच्या घरात टेबल, खुर्ची किंवा पलंग तुटला असेल तर ते घराबाहेर फेकून द्या. याशिवाय घरातील फर्निचर नेहमी परफेक्ट कंडिशनमध्ये असावे हेही लक्षात ठेवा.

तुटलेली भांडी ठेवणे अशुभ आहे

वास्तुशास्त्रानुसार तुटलेली भांडी घरात ठेवणे फारच अशुभ आहे. दिवाळीपूर्वी घरातील तुटलेली भांडी काढून टाका. अन्यथा लक्ष्मी माता कोपू शकते.

तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये

वास्तुशास्त्रानुसार तुटलेली मूर्ती घरात अजिबात ठेवू नका. दिवाळीपूर्वी घरातील देवाची मूर्ती तुटलेली आहे की नाही हे पाहावे. असेल तर ती काढून देवाची नवीन मूर्ती घरात स्थापन करा. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगले असेल.


घरातून तुटलेली काच काढा

तुटलेली काच घरात ठेवणे देखील अशुभ आहे. तुमच्या घरात तुटलेला बल्ब, तुटलेला फेस मिरर आणि इतर कोणतीही तुटलेली काचेची वस्तू असल्यास ती ताबडतोब काढून टाका. तुटलेली काच घरात नकारात्मक ऊर्जा आणते.


फाटलेले शूज आणि चप्पल घरात ठेवू नका

यंदा दिवाळीच्या साफसफाईमध्ये घरातील फाटलेले शूज आणि चप्पल बाहेर काढा. तुटलेली चप्पल आणि फाटलेल्या शूजमुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी