Reuse Old Towels: टॉवेल (Towel) हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. टॉवेलचा सातत्याने वापर होत असल्यामुळे काही काळाने टॉवेल खराब व्हायला सुरुवात होते. टॉवेल वापरून वापरून खराब झाल्यानंतर अनेकजण तो फेकून देतात. आंघोळ झाल्यावर अंगावर असणारे पाणी पुसण्यासाठी टॉवेलचा सहसा वापर केला जातो. मात्र अंग कोरडे करणे, एवढा एकच टॉवेल चा उपयोग असतो, असे नाही. थोडासा विचार केला तर अनेक प्रकारे या टॉवेलचा उपयोग करून घेता येऊ शकतो. घरातील बरीचशी कामे सोपी करण्यासाठी टॉवेलचा कल्पकरित्या वापर केला जातो. जाणून घेऊया वापरून खराब झालेल्या टॉवेलचा फेकून देण्याऐवजी नेमका काय वापर करता येऊ शकतो, याविषयी.
घर साफ राहावं यासाठी दरवाजातच पायपुसणे टाकले जाते. कुठल्याही व्यक्तीने बाहेरून आत येताना त्याला पाय पुसावेत आणि स्वच्छ पायांनी आत यावे, असा त्यामागचा विचार असतो. हे पायपुसणे तुम्ही टॉवेलपासून तयार करू शकता. यासाठी टॉवेलला दोन वेळा फोल्ड करा आणि चारही बाजूंनी शिवा. तुमचे पायपुसणे तयार झाले. आता हे पायपुसणे तुम्ही दरवाज्यापाशी ठेवू शकता. ते घाण झाले तर अगदी सहजपणे धुऊ शकता.
अधिक वाचा - Clove-Camphor Astro Tips: कापूर - लवंगाचे हे उपायानं उजळेल नशीब, भरेल तिजोरी; होतील प्रचंड फायदे
टॉवेल हा जाडसर आणि कॉटनपासून बनलेला असतो. कुठलीही वस्तू साफ करण्यासाठी त्याचा उत्तम वापर होऊ शकतो. टॉवेलला डस्टिंग क्लोथ म्हणून वापरात आणता येऊ शकतं. घरातील टेबल, खुर्च्या, कपाटे आधी गोष्टी साफ करण्यासाठी टॉवेलचा वापर होऊ शकतो. डस्टिंगसाठी बाजारातून महागड्या वस्तू आणण्याऐवजी तुम्ही जुन्या टॉवेलच्या वापराने पैसेही वाचवू शकता. या टॉवेलने केलेली सफाई तुमच्या घराचे सौंदर्य तितकेच खुलवेल.
घरात वेगवेगळ्या वस्तूंवर धूळ बसल्यामुळे त्या वस्तू खराब होण्याची शक्यता असते. अशा वस्तूंवर खराब झालेल्या टॉवेलच्या वापराने धूळ बसणे टाळता येते. तुमचे चपलांचे कपाट किंवा इतर उघड्यावर असणाऱ्या वस्तूंवर तुम्ही खराब झालेला टॉवेल झाकून ठेवू शकता. यामुळे त्या वस्तूंवर थेट धूळ बसणार नाही आणि अशा वस्तूंचे जीवनमानही वाढेल. दर काही दिवसांनी हा टॉवेल केवळ झटकून तुम्ही साफ करू शकता किंवा तो अगदी सहजपणे धुऊ शकता.
अधिक वाचा - Kiss Benefits: किस केल्यानं कमी होतो लठ्ठपणा, 1 मिनिटात 26 कॅलरीज बर्न होतात, हे आहेत आश्चर्यकारक फायदे
जुन्या टॉवेल चा वापर करून तुम्ही घरगुती स्वरूपाची पिशवीदेखील तयार करू शकता. यासाठी टॉवेल अर्ध्यातून कापा आणि दोन्ही बाजूंनी शिवून घ्या. उरलेल्या कापडापासून बंद तयार करा आणि ते या पिशवीला जोडून टाका. बाजारातून छोट्या-मोठ्या वस्तू आणण्यासाठी तुम्ही या पिशवीचा वापर करू शकता. यामुळे प्लास्टिकच्या बॅगा वापरण्याची गरजही पडणार नाही आणि पर्यावरणाचेही रक्षण होऊ शकेल.